28 February 2021

News Flash

बलात्काराला विरोध केला म्हणून तरुणीला गच्चीवरुन खाली फेकून दिलं

बलात्काराला विरोध केल्याने अल्पवयीन तरुणीला गच्चीवरुन खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

बलात्काराला विरोध केल्याने अल्पवयीन तरुणीला गच्चीवरुन खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी गच्चीवर असताना आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिला गच्चीवरुन खाली फेकून दिलं, ज्यामध्ये तिला गंभीर जखमा झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. तरुणी सध्या रुग्णालयात दाखल आहे.

पीडित तरुणीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने याआधीही अनेकदा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

उत्तर प्रदेशात लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना याआधी समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव बलात्कारानंतर बलात्काराच्या आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला असतानाही बलात्काराच्या घटना थांबताना दिसत नाहीयेत.

शहाजहानपूर येथून ७० किमी अंतरावर बरेली येथे १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आला. चार रिक्षाचालकांना स्थानकाजवळ तिचं अपहरण करत बलात्कार केला अशी माहिती रेल्वे पोलीस अधिकारी संतोष कुमार यांनी दिली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 4:02 pm

Web Title: a teen thrown from terrace after opposing sexual assault
Next Stories
1 काश्मीरमध्ये दंगेखोरांकडून शाळेतील विद्यार्थी ‘टार्गेट’, स्कूलबसवर दगडफेक
2 फेसबुकवर मोदींचाच बोलबाला, डोनाल्ड ट्रम्प यांना टाकले मागे
3 मध्य प्रदेश पोलिसांचा आणखी एक प्रताप, एकाच खोलीत घेतली तरुण आणि तरुणींची मेडिकल टेस्ट
Just Now!
X