काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे गुजरात येथील वलसाडमध्ये एका रॅलीसाठी उपस्थित होते. त्यावेळी एका महिलेने त्यांचे मंचावर जाऊन चुंबन घेतले. यासंदर्भातला व्हिडिओच एएनआयने पोस्ट केला आहे. राहुल गांधी मंचावर बसलेलेले असताना काही महिला येतात आणि त्यातली एक महिला राहुल गांधींच्या गालावर चुंबन घेते असा हा व्हिडिओ आहे.

राजकारणी हेदेखील लोकांना एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणेच वाटत असतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दलही महिला वर्गाला क्रेझ आहे. राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्त्व आवडत असल्याने या महिलेने त्यांना गालावर किस केले असावे असा अंदाज व्यक्त होतो आहे. इतर अनेक महिलांनी येऊन त्यांना हारही घातला. राहुल गांधी यांनी महिलेच्या या कृतीचं हसून स्वागत केलं.

पहा व्हिडिओ