09 August 2020

News Flash

Delhi Assembly Election: सर्व ७० जागांवर आपचे उमेदवार जाहीर; नवी दिल्लीतून लढणार केजरीवाल

आपच्या बैठकीत ४६ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ९ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. दरम्यान, सत्ताधारी आम आदमी पार्टीने (आप) मंगळवारी सर्व ७० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यांपैकी नवी दिल्ली मतदारसंघातून स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर पटपडगंज येथून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे निवडणूक लढवणार आहेत.

उमेदवारांच्या नावांची यादी अंतिम करण्यासाठी आपकडून मंगळवारी पॉलिटिकल अफेअर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झाले. ‘आप’ने सर्व ७० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना मनिष सिसोदिया म्हणाले, बैठकीत ४६ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ९ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच १५ जागांवर विद्यामान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यंदा ६ महिलांना ऐवजी ८ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तसेच ६ रिक्त जागांवरही नव्या लोकांना संधी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 7:44 pm

Web Title: aam aadmi party releases the list of candidates for delhi assembly elections 2020 aau 85
Next Stories
1 कांद्याची सरकारी किंमत २२ रुपये किलो; मात्र, सर्वसामान्यांना मिळतोय ७० रुपये किलो
2 ‘सीएए’, ‘एनआरसी’ आणि ‘एनपीआर’विरोधात सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचाही निषेध मोर्चा
3 “…तर मी योगी आदित्यनाथांच्या छातीवर बसून त्यांची हाडं मोडली असती”
Just Now!
X