14 October 2019

News Flash

अभिनंदन यांच्या शौर्याला युनिटकडून अनोखा ‘सलाम’

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या शौर्याल सलाम करण्यासाठी त्यांच्या मिग-२१ बायसन ५१ स्क्वाड्रनने नवीन पॅच वापरायला सुरुवात केली आहे.

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या शौर्याल सलाम करण्यासाठी त्यांच्या मिग-२१ बायसन ५१ स्क्वाड्रनने नवीन पॅच वापरायला सुरुवात केली आहे. २७ फेब्रुवारीच्या सकाळी झालेल्या हवाई संघर्षात अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ फायटर विमान पाडले होते.

त्याची आठवण म्हणून अभिनंदन यांच्या युनिटने या पॅचचा वापर सुरु केला आहे. फाल्कन स्लेयर आणि अॅमराम डॉडजर्स असे या पॅचवर लिहिले आहे. हवाई संघर्षाच्यावेळी पाकिस्तानी एफ-१६ ने डागलेली चार ते पाच एआयएम-१२० अॅमराम मिसाइल मिग-२१ बासयनने चुकवली होती. त्यामुळे अॅमराम डॉडजर्स असे या पॅचवर लिहिले आहे.

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्यादिवशी जेव्हा पाकिस्तानी फायटर विमान भारतीय हद्दीत घुसली होती. त्यावेळी अभिनंदन वर्थमान श्रीनगर एअरबेसवर तैनात होते. आता अभिनंदन यांची राजस्थानच्या सूरतगडमधील स्क्वाड्रन २३ मध्ये तैनाती करण्यात आली आहे.

अभिनंदन शनिवारी सूरतगड एअर फोर्स तळावर रुजू झाले. अभिनंदन यांची राजस्थानमध्ये पोस्टिंगची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ते बिकानेरमध्येही तैनात होते. अभिनंदन यांचे वडिलही हवाई दलात होते. वडिलांची पोस्टिंग राजस्थानमध्ये असताना अभिनंदन यांनी त्यांचे शिक्षण राजस्थानमध्ये घेतले आहे.

हवाई दलाच्या वैमानिकांच्या पोस्टिंगचा विषय गोपनीय असतो. फक्त आम्ही विंग कमांडर अभिनंदन यांची राजस्थानध्ये पोस्टिंग झाली आहे एवढेच सांगू शकतो. त्या व्यतिरिक्त काहीही सांगता येणार नाही असे हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सूरतगडमध्ये मिग-२१ बायसनचा बेस आहे.

First Published on May 15, 2019 7:36 pm

Web Title: abhinandan varthamans unit gets new patch