News Flash

अभिनेत्रीने पतीसमोरच केली एक्स बॉयफ्रेंडची हत्या

तिने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला

छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने पतीसमोरच एक्स बॉयफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या कोलाथुर येथील घरी एक्स बॉयफ्रेंडच्या डोक्यात काठीने वार करून हत्या केली. चेन्नई येथे ही घटना घडली. एस. देवी असे या अभिनेत्रीचे नाव असून, तिने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला. तसेच या गुन्ह्यात अभिनेत्रीचा पती बी. व्ही. शंकर यालाही पोलिसांनी अटक केली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एस. देवीला तिचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा सोबत राहण्यासाठी आग्रह करत होता. त्यातून अभिनेत्रीने टोकाचे पाऊल उचचले, असे पाेलिसांनी म्हटले आहे. आठ वर्षांपूर्वी एस. देवी आणि रवी हे रिलेशनशीपमध्ये होते. त्यावेळी एस. देवी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत होती असे पोलिसांनी म्हटले.

दोन वर्षांपूर्वीच देवीच्या आणि रवीच्या नात्याबद्दल पती शंकर व त्यांच्या कुटुंबीयांना कळाले होते. ती माहिती मिळाल्यानंतर रवी आणि एस. देवीने लग्न करावे असे सल्ला तिला देण्यात आला. पण देवीने रवीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देवीच्या पतीने तिला छोटा व्यवसाय सुरु करुन दिला. पण देवीशी संपर्क होत नसल्यामुळे रवीने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. रवी देवीचा शोध घेत तिची बहिण लक्ष्मीच्या घरी पोहोचला. लक्ष्मीने तातडीने देवी आणि तिच्या पतीला बोलावून घेतले. दरम्यान, देवी आणि रवी यांच्यामध्ये वाद झाला. रागाच्या भरात देवीने काठी आणि हातोड्यानं रवीच्या डोक्यात वार केला. यात त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर स्वत: देवीने राजामंगलम पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 11:40 am

Web Title: actress beats ex boyfriend to death in tamil nadu avb 95
Next Stories
1 देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही : नरवणे
2 सत्तेत असणाऱ्या सरकारच्या आदेशानुसार काम करावं लागतं – बिपिन रावत
3 नौशेरा सेक्टरमध्ये दशतवाद्यांचा गोळीबार दोन जवान शहीद
Just Now!
X