मध्य प्रदेशातल्या रीवा भागात पोलिसांनी एका जोडप्याला मास्क न लावल्याने अडवलं. मात्र, ते या पोलिसांना चांगलंच महागात पडलेलं दिसत आहे. पोलिसांना या दाम्पत्याला अडवल्यानंतर या दोघांनी अगदीच न पटणारी. मूर्खपणाची कारणं देत या पोलिसांशी चांगलीच हुज्जत घातली.

पोलिसांनी अडवल्यावर या पोलिसांनी चक्क मंगळवारचा बहाणाही केला. मंगळवारी खोटं बोलाल तर मराल असा इशाराच या दाम्पत्याने पोलिसांना दिला आहे. मास्क न लावण्याच्या या बहाण्यामध्ये अचानक हनुमानाचीही एन्ट्री झाली. सगळ्या नियमांना धाब्यावर बसवत या दाम्पत्याने चक्क पोलिसांनाच सुनावलं. हे दोघेही मास्क परिधान न करता रस्त्यावरुन चालले होते. म्हणून त्यांना पोलिसांनी अडवलं.

आणखी वाचा- पोलीस नव्हे, देवदूत! जखमी महिलेला झोळीत घेऊन अ‍ॅम्ब्युलन्ससाठी ४ किलोमीटरची पायपीट!

ही महिला आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाची कर्मचारी आहे. ती आपल्या पतीसोबत जात होती. त्यावेळी मास्क परिधान न केल्याने पोलिसांनी तिला अडवलं. त्यावेळी तिने अतर्क्य कारणं देत पोलिसांशी हुज्जत घातली. हनुमानाचा दाखला देत, मंगळवारी खोटं बोलाल तर मराल अशी धमकी देत तिने पोलिसांशी वाद घातला.

पोलिसांनी या सगळ्या घटनाक्रमाचा व्हिडिओ बनवला आणि या दोघांना जाऊ दिलं. पोलीस अधिक्षक राकेश कुमार सिंह यांनी लोकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. मास्क परिधान करा, फक्त कपडा वापरु नका, कोविडपासून बचाव करायचा असेल तर मास्क परिधान करणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.