19 January 2018

News Flash

गोंधळात कामकाज रेटण्यावरून अडवाणी नाराज

विरोधकांच्या गोंधळाला न जुमानता कामकाज रेटून नेण्याच्या सत्ताधारी भाजपच्या रणनीतीवरून पक्षाचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी..

प्रतिनिधी, नवी दिल्ली | Updated: August 12, 2015 1:40 AM

LK Advani on Babri Masjid case : बाबरी मशीद पाडल्याच्या १९९२ मधील प्रकरणात भाजपचे तेरा नेते व हिंदुत्ववादी संघटनांचे इतर नेते यांच्यावर गुन्हेगारी कटाचा आरोप पुनरुज्जीवित केला जाण्याची शक्यता आहे.

विरोधकांच्या गोंधळाला न जुमानता कामकाज रेटून नेण्याच्या सत्ताधारी भाजपच्या रणनीतीवरून पक्षाचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडेच नाराजी व्यक्त केली आहे. गोंधळात कामकाज तहकूब करण्याऐवजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन कामकाज सुरूच ठेवतात. पावसाळी अधिवेशनात एकदाही विरोधकांना समजावण्यात अपयशी ठरल्याने सरकारने कामकाज रेटण्याची रणनीती आखली. मात्र गोंधळ सुरू असताना कामकाज सुरू ठेवणे कदापि योग्य नाही; त्याऐवजी कामकाज तहकूब करा, अशा शब्दात अडवाणी यांनी राजनाथ सिंह यांना त्यांच्या संसदेतील दालनात सुनावले. हा सर्व प्रकार सुरू असतानादेखील लोकसभेचे कामकाज सुरूच होते. सभागृहात असताना अडवाणी यांनी राजनाथ सिंह व वैंकय्या नायडू यांना यासंबंधी विचारणा केली. मात्र सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अडवाणी थेट सभागृहातून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ राजनाथ सिंहदेखील बाहेर पडले.
भाजपकडून अडवाणी हे सभागृहात नियमित उपस्थित राहणारे सदस्य आहेत. वर्षांनुवर्षांची ही परंपरा अडवाणी आजही निभावतात. त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ खासदाराने नाराजी व्यक्त केल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. आज लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास प्रचंड गोंधळात सुरू होता. काँग्रेसचे सदस्य ललित मोदी प्रकरणावरून विदेश मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी करीत होते. हातातील फलक लोकसभा टीव्हीच्या स्क्रिनला व्यापतील अशा बेताने धरून काँग्रेसची निदर्शने सुरू होती. अशाही परिस्थितीत महाजन यांनी कामकाज सुरूच ठेवले.
त्यामुळे अडवाणी सभागृहाबाहेर गेले ते थेट राजनाथ सिंह यांच्या दालनासमोर. राजनाथ सिंह यांच्याकडे तीव्र शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. जे सुरू आहे ते योग्य नाही; अशी कानउघाडणी करून अडवाणी संसदेबाहेर जात असताना समोर माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ दिसले. त्यांना सवयीप्रमाणे हात जोडून नमस्कार करीत अडवाणी यांनी मनातील भाव व्यक्त केला. संसदीय संकेतानुसार गोंधळ सुरू असताना कामकाज पुढे रेटणे शिष्टाचार समजला जात नाही. मात्र विरोधकांच्या आडमुठेपणामुळे कामकाज सुरू ठेवावे, ही रणनीती अडवाणी यांना मान्य नव्हती, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

First Published on August 12, 2015 1:40 am

Web Title: advani upset for not functioning parliament
टॅग Lk Advani
 1. A
  aditya
  Aug 12, 2015 at 1:06 pm
  मग मोडी त्याची चौकशी का करीत नाही. कारण मोदी यांची ती बोलाचीच कढी व बोलाचाच भात होता. असेल मोदी मध्ये तयारी तर कर चौकशी. पण तयारी नाही. आज दीड वर्ष झाले पण भ्रष्टाचारार वर कारवाई नाही. सामान्य माणसाने जर ललित मोडी सारख्या आरोपीला मदत केली असती तर याच सरकारने जेल मध्ये पाठीवले असते. हाच कोणता न्याय. स्वराज यांना वेगळा आणि सामान्य माण वेगळा? हेच का अच्चे दिन?
  Reply
  1. A
   aditya
   Aug 12, 2015 at 1:12 pm
   मोडी दीड वर्षात काय काम केले ते तरी सांग. दररोज सीमेवर जवान मारत आहेत. पण मोडी ला तेथे जौन विचार पूस केले नाही. पण परदेशात फिरायला वेळ आहे. महागाई, भ्रष्टाचार वादात आहे. पण कारवाई करायला वेळ नाही. आधार, विमा, व इतर कामे हि सर्व मनमोहन सिंघ यांच्या काळातली, याने काय केले ते तरी सांग. शेतकरी यांना कर्ज माफी नाही पण व्यापारांना जी अस टि, एल बी टि माफी. वाह रे मोडी सरकार.
   Reply
   1. R
    Rohan
    Aug 12, 2015 at 9:10 am
    उपयुक्तता संपलेलं जुनं खोड
    Reply
    1. S
     Shriram
     Aug 12, 2015 at 10:51 am
     अडवाणी यांना आपले अस्तित्व दाखवून 'मध्यस्थ' म्हणून भूमिका अदा करावी आणि थोडे relevant व्हावे असे वाटत असल्यास ते नैसर्गिक आहे. भाजपने कोणत्या मर्यादेपर्यंत खाली उतरून सलोखा करायचा हे त्यांना सांगून प्रयत्न करू द्यावे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली. समजा सलोखा झाला आणि GST बिल पास झाले तर उत्तमच आहे पण विरोधकांच्या हेकेखोरपणामुळे काही तोडगा निघाला नाही तर नाराजी दाखवण्याबाबत अडवाणी तरी भानावर येतील.
     Reply
     1. S
      suraj
      Aug 14, 2015 at 1:34 pm
      स्वत इस्टेट नाही कमावली पण सरकारी वनजमिनी, शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानी विकून दुसर्याला कमवून दिली नंतर तोच पैसा निवडणुकीत वापरला , आणखी अदानीच्या विमानाने फेरफटके मारले .. दहा लाखाचे सुत घातले एवढी किरकोळ कामे केली ....
      Reply
      1. S
       suraj
       Aug 14, 2015 at 1:40 pm
       हे म्हणजे असे झाले तुम्ही खाल्ले आम्ही पण खाणार .....कॉंग्रेस ने लुटले आता तुम्ही लुटा ...... काय उत्तर देताय आधी ते तर लक्षात घ्या ...आपण कॉंग्रेस ला बाजूला सारले त्यांनी केलेल्या पापामुळे आणि आता जर भाजप तेच करत असेल तर मग काय फायदा आपला ... न खाउंगा न खाणे दुंगा विसरलात काय ...कॉंग्रेस ची पापे धुतली काय नाय धुतली काय पण तुम्ही कशाला कॉंग्रेस च्या आडून स्वताचे गल्ले भरताय
       Reply
       1. S
        suraj
        Aug 13, 2015 at 12:35 pm
        तू काशाल बरळतोय उगाच चंद वाणी ....तुला पण लागण झालेली दिसतेय ची ....
        Reply
        1. S
         suraj
         Aug 12, 2015 at 11:01 am
         भाजप मध्ये माणसे स्वताच्या पक्षामधील जेष्ठ माणसाचा आदर राखू शकत नाही, ज्याने पक्ष उभा केला त्याला विचारात नाही ....त्यामुळे जनतेने भाजप कडून संसदेचा आदर, किंवा जनतेच्या समस्येचे निरसन करण्याची इच्छा सोडून द्यावी ...... हे फक्त त्यांचे छुपे अजेंडे चालवणार आहेत
         Reply
         1. S
          suraj
          Aug 12, 2015 at 11:07 am
          हिंदी मध्ये एक खूप चांगले वाक्य आहे ...हर के दिन आते हे .... त्यामुळे अडवाणी जी आता तुम्ही संत बसा कारण आता त्यांची चालती आहे .... जेवा ते गोत्यात येतील तेवा एकाच घाव करा कि ती तिकडी चारीमुंड्या चित झाली पाहिजे ....
          Reply
          1. S
           subhash uttarwar
           Aug 12, 2015 at 9:32 am
           अडवाणीचे नाराज होणे स्वाभाविक आहे पण या मती भ्रष्ट गोंधळी कॉंग्रेस चे काय करायचे ?ज्यांनी आपला कार्यक्रम फक्त संसद बंद पाडणे हा ठेवला आहे .सोनिया आणि राहुल गांधीची लोकशाही हि अशी आहे .मोडी सरकार ला निव्वळ काम न करू देणे हाच उद्देश आहे .कॉंग्रेसने दहा वर्षात जे केले नाही ते मोदिनी एका वर्षात केले आहे .हा सारा तमाशा म्हणजे फक्त कॉंग्रेसचा मोडी सरकारला बदनाम करण्याचा प्रत्यन आहे .जळ फलात आहे .जनता कॉंग्रेसचे हे ढोंग ओळखते
           Reply
           1. S
            subhash uttarwar
            Aug 12, 2015 at 9:59 pm
            चौकशी त्याची होते जेव्हा घोटाळा होतो .कॉंग्रेस ने घोटाळे केले म्हणून सर्वोच्च न्यायालयाने चौकशी लावली .इथे घोटाळा नाही .ललित मोडी सुद्धा पळाला कॉंग्रेस चे सरकार असताना . का पळू दिले ?कॉंग्रेस आपले पाप झाकण्या साठी निव्वळ बोंबा मारते आहे .
            Reply
            1. Dinesh Joshi
             Aug 16, 2015 at 9:24 pm
             आता जरा पैसे कमी घ्या. खान्ग्रेसला कडकी आहे. जे तर फुकट कॉमेंट्स करा. डोके ठेऊन कॉमेंट करणार असशील तर भाजपमध्ये विचारून बघेन, पेड कॉमेंट करणारे हवेत का? पण नीट शुद्धलेखन काढावे लागेल. शेतकरी म्हणून सोलापुरात काम करून जमणार आहे का?
             Reply
             1. Dinesh Joshi
              Aug 12, 2015 at 9:55 pm
              केवढी भाजपची काळजी. काकासाहेब पवारांनी भाजपची लाल करायला सांगितले आहे की मोदींना विरोध करेल त्याची लाल करायचेसुद्धा पैसे देणार सांगितले आहे? आपण काय लिहितो, कसे लिहितो याचा ताळतंत्र आहे का? बेवडा बरळतो तसे मोदीविरोधी काही बरळत सुटायचे एवढेच काकांनी सांगितले आहे काय?
              Reply
              1. Dinesh Joshi
               Aug 12, 2015 at 10:01 pm
               खान्ग्रेसच्या पेड चमच्यांचे सामान्य ज्ञान? मी दोन प्रश्न विचारले की थोबाडे गप्प होतात. उगाच मोदी, असे दोन चार शब्द वापरतात. आणि मग शहाण्या, बैल वगैरे म्हणायला सुरुवात करतात. एकेकाचे शुद्धलेखन वाचले की तिकडेच कवटी सरकते!
               Reply
               1. Dinesh Joshi
                Aug 12, 2015 at 9:49 pm
                ते काय साखर कारखान्याचे चेअरमन आहेत की खान्ग्रेसचे गाढव नेते. शहाणे आहेत म्हणून नुसती बडबड करत बसले. तुमचे पवार बघा, दिल्लीत चाय पार्टी करून तिसरी आघाडी जमतेय का बघताहेत.
                Reply
                1. Dinesh Joshi
                 Aug 13, 2015 at 6:44 pm
                 पैसे खाणा-या तुमच्या लीडर्सपेक्षा स्वच्छ माणूस नक्कीच बरा. १५ वर्षात एक भ्रष्टाचाराचा आणि स्वत:ची इस्टेट केल्याचा डाग नाही. उगाच नाही ३ वेळा २/३ बहुमताने CM झाला. इतके वर्षे खान्ग्रेसमध्ये असून पवारांना एकट्याला बहुमत मिळवायला जे होते का?
                 Reply
                 1. Dinesh Joshi
                  Aug 12, 2015 at 9:57 pm
                  सोंडक्या शुद्धलेखन सुधार रे! तुला आधी राजकीय समज नाही, दगडाची अक्कल नाही, धड लिहिता येत नाही, कशाला एवढी मगजमारी करतोस? मनमोहन सिंगना काम नव्हते करू दिले? मग १० वर्षे काय टाळ्या पिटत बसले होते? आणि तुला कुठला नाच येतो? बाल्याचा की तमाशातील मावशीचा ?
                  Reply
                  1. Dinesh Joshi
                   Aug 12, 2015 at 5:43 pm
                   होक्का आणि २६/११ झाले, मागच्या १० वर्षात इतके बॉम्बस्फोट झाले तेव्हा तुमचे सरदार, पप्पू, त्याची आयशी आणि तुमचे पवार काय लढायला आघाडीवर गेले होते? एकदा संरक्षणमंत्री बनवले तर दाउदच्या लोकांना डिफेन्सच्या विमानातून फिरवले. नरसिंह रावना झक मारत महाराष्ट्रात परत पाठवावे लागले होते. अक्कल नसेल तर बोलू नका आणि निर्बुद्ध दत्ता, SM ना सुद्धा अक्कल शिकवा.
                   Reply
                   1. Dinesh Joshi
                    Aug 14, 2015 at 6:38 pm
                    होक्का! मग दाउदचा कारी गोएंका बिल्डर याला बारामतीत डेअरी कोणी काढायला मदत केली? त्याच्या विमानाने कोण फिरत होते? ्ल्याला बारामतीत वाईनरी कोणी काढून दिली? द. आफ्रिकेला वर्ल्डकप बघायला त्याच्या विमानाने कोण कोण गेले? मोदी असल्या ट्रिप्स करायला कोणाचे विमान वापरत नाहीत. रेडी रेकनर भावाने तटकरे याने जमिनी स्वत:च्या धंद्याला कशा घेतल्या? टग्याच्या एकूण जमिनी किती(२१ लाख चौ. फुट अधिकृत आहे). आणखी माहिती हवी? भिकारचो* आम्हाला शिकवतो!
                    Reply
                    1. Dinesh Joshi
                     Aug 12, 2015 at 6:42 am
                     १: लालूशेठ अडवाणी ना? मोदींनी काही केले तरी त्यांना आवडणार नाही. या बाबतीत कुबेरांचे वडील शोभतील. नावडत्याचे मीठ अळणीच काय साखरपण कडू आहे. चुकून सगळे सुरळीत झाले असते तर मोदींनी बोटचेपेपणा केला म्हणून बोंबलत सुटले असते. आता नियम, संकेत बरे आठवतात, १९९० रथयात्रा काढताना नियम आणि संकेत काय तुमच्या धोतरात अडकून बसले होते? पाकिस्तानात जाऊन जीनांची आरती करून भाजपला कोंडीत नेउन टाकताना अक्कल काय गोखाडीत चरायला गेली होती? तुमच्या प्रभावाने भाजपला मते मिळायचे दिवस केव्हाच सरले!
                     Reply
                     1. Dinesh Joshi
                      Aug 12, 2015 at 6:46 am
                      २: वास्तविक तुम्हाला हाकलून स्वराजना विरोधी पक्षनेते केले तेव्हाच तुमची एक्स्पायरी डेट संपली होती. वेळीच शहाणे व्हा. भाजप राहिला लांब देशालादेखील तुमची फारशी गरज नाही. तुमची मुले नीट सेटल झाली आहेत. तुम्हाला भरभरून मिळाले आहे (पंतप्रधानपद मिळाले नसले तरी!), आता नव्या लोकांना त्यांच्या अकलेने काम करू द्या. यावेळी भाजप सत्तेवर आली ती मोदी आणि RSS मुळे. RSS ला तुम्ही नको आहात, मोदीविषयी आम्ही काही बोलत नाही, पण सुज्ञास अधिक सांगणे न लगे. अन्यथा अर्जुनसिंग व्हायला फारसा वेळ लागत नाही.
                      Reply
                      1. Load More Comments