अफगाणिस्तानात सुरू असलेल्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संरक्षण पुरविणाऱ्या तब्बल १६ पोलिसांना गेल्या २४ तासांत अतिरेक्यांनी ठार केले आह़े
 त्यापैकी आठ पोलिसांचा तर अतिरेक्यांनी शिरच्छेदही केला आह़े  दक्षिण झाबूल प्रांतातील एका गावात निवडणूक सुरक्षा व्यवस्थेच्या कामावर गेल्या दोन आठवडय़ांपासून असणाऱ्या आठ पोलिसांची धडे मंगळवारी सापडली, असे प्रांताचे उपगव्हर्नर मोहम्मद जन रसोऊल्यार यांनी सांगितल़े  
  हल्ल्यानंतर अतिरेक्यांनी पोलिसांना ओढून नेल़े  त्यांचे मृतदेह नंतर नवाबहार जिल्ह्यात सापडल़े  तसेच उत्तर बदक्षन प्रांतातही तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात बुधवारी आठ पोलीस ठार झाले आहेत़  अतिरेक्यांनी सभोवतालच्या टेकडय़ांवरून अग्निबाणांचा मारा करीत हा हल्ला केला़