ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशा रवीच्या अटकेनंतर दिल्ली न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या आणि वकिल निकिता जेकब यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावले आहे. दरम्यान निकिता जेकब यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे. निकिता जेकब या मुंबई उच्च न्यायालयात वकिल म्हणून काम करतात.
आणखी वाचा- समजून घ्या : टूलकिट म्हणजे काय? ते कशासाठी आणि कसं वापरतात?
पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या २१ वर्षीय दिशा रवीच्या अटकेनंतर निकिता जेकब यांच्याविरोधात वॉरंट निघाले आहे. दिशा रवीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्यांशी संबंधित टूलकिट सोशल मीडियावर शेअर केल्याच्या प्रकरणात दिशा रवीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरुन सोमवारी दिल्ली न्यायालयाने निकिता जेकब विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावले.
आणखी वाचा- ‘ग्रेटा टूलकिट’ प्रकरण : न्यायालयात बोलताना दिशाचे डोळे आले भरून; म्हणाली…
निकिता जेकब यांच्या घराती झडती घेण्यासाठी ११ फेब्रुवारीला पोलिसांची टीम त्यांच्या घरी गेली होती, असे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमधील सूत्रांनी सांगितले. संध्याकाळच्या सुमारास ही टीम निकिता जेकब यांच्या घरी पोहोचली, त्यावेळी त्यांनी निकिता जेकब यांची कुठलीही चौकशी केली नाही. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
आणखी वाचा- “भारत मूर्खपणाची रंगभूमी ठरतोय, जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर…”
सामाजिक कार्यकर्त्या, वकिल असलेल्या निकिता जेकब यांनी तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण स्पेशल सेलचे अधिकारी त्यांच्या घरी येऊन गेल्यानंतर त्या गायब झाल्या असे दिल्ली पोलिसातील सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी निकिता जेकब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 12:57 pm