पाकिस्तानकडून वारंवार होणाऱया शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे व्यथित झाल्याची भावना भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केल्यावर आता पाकिस्ताननेही शस्त्रसंधीच्या प्रश्नावर व्यथित असल्याचे म्हटले आहे.
संबंध सुधारावे असे वाटत असेल तर वेळीच लक्ष घाला..
पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ऐझाज चौधरी म्हणाले की, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीनंतर सुद्धा शस्त्रसंधीच्या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याने पाकिस्तानही व्यथित आहे.
तसेच ऐझाज यांनी यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिका दौऱयावर असताना भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या 27 लष्करी तळावर हल्ला केला होता असा आरोप केला आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नियंत्रण रषेवर काय चाललंय, याकडे ‘लक्ष द्यावे’, अशा शब्दांत पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांना फटकारल्यानंतर पाकिस्तानकडून अझीझ यांनी आम्हीही या प्रश्नावर दुखी असल्याचे वक्तव्य केले आहे