19 January 2021

News Flash

‘सीरम’पाठोपाठ ‘भारत बायोटेक’ची लसही रवाना; ११ शहरांमध्ये होणार वितरण

'कोविशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' या दोन लसींना सरकारने परवानगी दिली आहे.

पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटननंतर आता हैदराबादमधील भारत बायोटेकने आपली कोव्हॅक्सिन लसीची पहिली बॅच पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी देशातील विविध शहरांमध्ये पाठवली आहे. भारत बायोटेकनं दोन डोसची कोव्हॅक्सिन लस बुधवारी देशभरातील ११ शहरांमध्ये पाठवली. मात्र, एकूण किती डोस भारत बायोटेकने पाठवले आहेत, हे अद्याप कळू शकलेलं नाही. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

“भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन लसीची पहिली बॅच मध्यरात्री १ वाजता विविध शहरांसाठी रवाना झाली. हा परिपूर्ती आणि अभिमानाचा क्षण आहे. देशातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी स्वदेशी लस पूर्णपणे सज्ज आहे” असं ट्विट करत भारत बायोटेकनं याबाबत माहिती दिली.

सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना भारत सरकारने आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरु होणाऱ्या सरकारच्या सार्वजनिक लसीकरणात या दोन लसींचा वापर केला जाणार आहे.

दरम्यान, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी घोषणा केली होती की, सरकारने कोव्हॅक्सिन लसीच्या ५५ लाख डोस खरेदीचा करार केला आहे. यांपैकी १६.५ लाख डोस कंपनी सरकार मोफत देणार आहे. तर उर्वरित ३८.५ लाख डोस २९५ रुपये प्रतिडोस याप्रमाणे सरकारला देणार आहे. या किंमतीत कराचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही.

भारत बायोटेकनं सांगितलं की, कंपनीने गनवरम, गुवाहाटी, पटना, दिल्ली, कुरुक्षेत्र, बंगळुरु, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई आणि लखनऊ या शहरांसाठी बुधवारी पहाटे लसीची पहिली बॅच यशस्वीरित्या पाठवून दिली आहे. यांतील प्रत्येक व्हायोलमध्ये २० डोस आहेत. यांपैकी काही शहरांमध्ये ही लस पोहोचली असून उर्वरित शहरांमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत पोहोचणार असल्याचेही कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 4:46 pm

Web Title: after the serum bharat biotech vaccine also delivered for vaccination for 11 cities of the country aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 भारत-पाकिस्तान सीमेवर आढळला १५० मीटर लांब बोगदा; बीएसएफने घुसखोरीचा डाव उधळला
2 भय इथले संपत नाही… लस घेतल्यानंतरही झाला करोनाचा संसर्ग; डॉक्टरही संभ्रमात
3 करोना लस: “काही मुस्लिमांचा भारतीय वैज्ञानिकांवर विश्वास नाही, त्यांनी पाकिस्तानात जावं”
Just Now!
X