ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा छोटा भाऊ अकबरूद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा विधान केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. तसेच, मी केलेले ‘१५ मिनिटांचे’ वक्तव्य अनेकांच्या जिव्हारी लागलेले आहे. ज्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत, त्यामुळेच या अकबरुद्दीन ओवेसीचा एवढा द्वेश केला जातो.

तेलंगणमधील करीमनगर येथे एका सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. यावेळे ते म्हणाले की, लक्षात ठेवा जग त्यालाच भीती दाखवते जो स्वतः घाबरतो. तसेच जग त्यालाच भीत असते जो जगाला घाबरवू शकतो. सौ सुनार की एक लोहार की हे विसरु नका असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी अकबरुद्दीन ओवेसी यांनी हे देखील म्हटले की, आम्हाला आमच्या पक्षाच्या पराभवाचा काहीच त्रास नाही, मात्र भाजपाचा विजय मान्य नाही. एवढेच नाहीतर सर्व मुस्लिमांनी भाजपाविरोधात एक व्हायला हवे. संघ, भाजपा, बजरंग दल आदींना मुस्लिमांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी २०१३ मध्ये ” आम्ही २५ कोटी आहोत आणि तुम्ही हिंदू १०० कोटी आहात. फक्त १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. मग कोणामध्ये किती दम आहे हे दिसेल,” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.