News Flash

गोव्यात परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदीची अनुमती

हे फेमा कायद्याचे उल्लंघन असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले

परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदी करण्याची आणि नाइट क्लबसारख्या व्यवसायाची अनुमती दिल्याबद्दल गोवा विधानसभेत बुधवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकान्त पार्सेकर यांना चांगलेच घेरले. हे फेमा कायद्याचे उल्लंघन असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

भाजपचे आमदार मायकेल लोबो, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, काँग्रेसचे दिगंबर कामत, गोवा विकास पार्टीचे फ्रान्सिस्को पचेको आणि अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी, मुख्यमंत्र्यांनी फेमा कायद्याचे उल्लंघन करण्याची अनुमती दिली, अशी टीका केली.

गोव्याच्या उत्तर भागातील आरपोरा गावात जर्मनीच्या एका नागरिकाला कृषी जमीन घेण्याची अनुमती देण्यात आली, असा दावा लोबो यांनी केला. इतकेच नव्हे तर अबकारी परवानाही त्याला देण्यात आला, असेही ते म्हणाले. ज्या नागरिकाला अबकारी परवाना देण्यात आला त्याच्या मालकीचा एक नाइट क्लबही आहे आणि हा प्रकार फेमा कायद्याचे उल्लंघन आहे, असेही लोबो म्हणाले.

दरम्यान, याला उत्तर देताना पार्सेकर म्हणाले की, ज्या परदेशी नागरिकाबद्दल बोलले जात आहे तो भारतीय वंशाचा कार्डधारक आहे. मात्र त्याला कृषी जमीन खरेदी करण्याची अनुमती कशी देण्यात आली ते पार्सेकर यांनी स्पष्ट केले नाही, त्यावर विरोधकांनी टीका केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 12:37 am

Web Title: agricultural land purchase allowed to foreign citizens in goa
Next Stories
1 नेपाळला पुराचा तडाखा; ३९ ठार
2 मोदी माझा जीवही घेतील: केजरीवाल
3 दंतेवाडा नक्षली हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील दोन जवान जखमी
Just Now!
X