News Flash

आॅगस्टा वेस्टलँड प्रकरणातील साक्षीदाराची हत्या झाल्याची भीती; ईडीची धक्कादायक माहिती

गेल्या चार महिन्यांपासून ते बेपत्ता आहेत

संग्रहित छायाचित्र

मध्ये प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रकुल पुरीच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील न्यायालयाला धक्कादायक माहिती दिली. गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आॅगस्टा वेस्टलँड प्रकरणातील साक्षीदाराची हत्या करण्यात आली आहे, अशी शंका ईडीने व्यक्त केली आहे.

आॅगस्टा वेस्टलँड व्यवहारात रकुल पुरी यांनी स्वतःच्या कंपन्यांच्या माध्यमातून लाच घेतली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणाचा ईडी तपास करीत आहे. तपास यंत्रणांच्या रडारवर आलेल्या पुरी यांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने सरकारी वकिल डी.पी. सिंह यांनी पुरी यांनी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांना सांगितले की, पुरी हे प्रभावशाली व्यक्ती असून, फरार होऊ शकतात. याचबरोबर पुरावे आणि साक्षीदारांनावरही ते प्रभाव टाकु शकतात, अशी शंका त्यांनी उपस्थित केली.

तसेच याप्रकरणातील के.के. खोसला या साक्षीदाराचा खून केल्याचा संशय आहे. ते ७३ वर्षांचे असून, गेल्या चार महिन्यांपासून ते बेपत्ता आहेत. तपास यंत्रंणा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असून, त्यांच्या कुटुंबालाही धक्का बसला आहे. त्यांनी अद्याप खोसला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली नसल्याचे सिंह यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले. खोसला हे पुरी यांच्यासाठी काम करायचे. अनेक व्यवहारात त्यांचा सहभाग होता. त्यांनी ईडीसमोर म्हणणे मांडले होते. त्यात आर्थिक व्यवहारांची माहिती दिली होती. मात्र, काही दिवसांनी त्यांनी आपला जबाब बदलला. तेव्हापासून खोसला बेपत्ता असल्याचे सिंह यांनी न्यायालयात सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:17 pm

Web Title: agustawestland case witnessed must have been killed says ed bmh 90
Next Stories
1 फारूक अब्दुलांची ईडीकडून चौकशी
2 दुबई: पंतप्रधानांच्या सहाव्या पत्नीने लंडन कोर्टात मागितले संरक्षण
3 घरातून पळून जाऊन लग्न केलं, दुसऱ्यादिवशी पत्नीला ट्रेनमधून फेकलं
Just Now!
X