News Flash

धक्कादायक, घरात कोणी नाही पाहून सासऱ्याने सुनेकडे केली शरीरसुखाची मागणी

महिला तिच्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन घराबाहेर पळाली...

संग्रहित छायाचित्र

सासऱ्यांनी त्यांच्यासोबत  शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली, असा आरोप सुनेने केला आहे. या प्रकरणी महिनेने अहमदाबादच्या गोमतीपूर पोलीस ठाण्यात सासऱ्यांविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. सासू घरामध्ये नसताना हा सर्व प्रकार घडला.

सासऱ्यांनी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर महिला तिच्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन घराबाहेर पळाली. तिने आपल्या सासूला फोन करुन सर्व घडलेला प्रकार सांगितला. सासू आपल्या मुलीकडे गेली होती. सासू घरी आल्यानंतर, या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी ती सूनेला आपल्यासोबत पोलीस ठाण्यात घेऊन गेली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या, दुबईत भारतीय तरुणाला जन्मठेप

कलम ३५४ अ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पण अजून आरोपीला अटक केलेली नाही. शनिवारी नवरा कामासाठी घराबाहेर होता आणि सासू मुलीकडे गेली होती. त्यावेळी रात्रीच्या सुमारास सासरे तिच्या शेजारी येऊन झोपले व त्यांनी विनयभंग केला असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 3:18 pm

Web Title: ahmedabad woman molested by father in law dmp 82
Next Stories
1 यूजीसी मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी पुढच्या सोमवारी
2 राजस्थानात भाजपाला धक्का; सहा आमदारांविरोधातील याचिका न्यायालयानं फेटाळली
3 बकऱ्याच्या अटकेस कारण की… मास्क घातलं नाही; उत्तर प्रदेश पोलिसांची ‘कारवाई’
Just Now!
X