23 September 2020

News Flash

सीबीएसईची वैद्यकीय पूर्वपरिक्षा येत्या २५ जुलै रोजी

कॉपी व इतर गैरप्रकारांमुळे रद्द करण्यात आलेली अखिल भारतीय वैद्यक प्रवेश पूर्वपरीक्षा (एआयपीएमटी) २५ जुलै रोजी पुन्हा घेण्याची घोषणा मंगळवारी सीबीएसई मंडळाने केली.

| June 23, 2015 05:27 am

कॉपी व इतर गैरप्रकारांमुळे रद्द करण्यात आलेली अखिल भारतीय वैद्यक प्रवेश पूर्वपरीक्षा (एआयपीएमटी) २५ जुलै रोजी पुन्हा घेण्याची घोषणा मंगळवारी सीबीएसई मंडळाने केली. यापूर्वी १५ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले होते. आधीच्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने १५ जून रोजी अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा रद्द केली होती व चार आठवडय़ात पुन्हा परीक्षा घेण्याचा आदेश दिला होता. मात्र, इतक्या कमी कालावधीत फेरपरीक्षा घेऊन निकाल लावणे शक्य नसल्याने न्यायालयाकडे आणखी कालावधीची मागणी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केली होती. त्यानंतर न्यायालयाने हा कालावधी वाढवून देत सीबीएसईला १७ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्यास सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 5:27 am

Web Title: aipmt 2015 16 to be re conducted on july 25 cbse
Next Stories
1 क्रेडिट, डेबिट कार्डाच्या वापरावर करसवलत
2 भाजपमधील नाराज नेत्यांच्या समर्थनार्थ दिल्लीत फलकबाजी, अंतर्गत वाद चव्हाट्यावर
3 पंतप्रधानांनी मौन सोडावे
Just Now!
X