02 June 2020

News Flash

सिरियात हवाई हल्ल्यात आयसिस नेत्यासह ११ ठार

फेरदाओस जिल्ह्य़ात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हा नेता मारला गेला

सिरियात राका येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात आयसिस नेत्यासह ११ जण ठार झाल्याची माहिती निरिक्षकांनी दिली आहे.
सिरियातील मानवाधिकार निरीक्षकांनी हवाई हल्ला करणाऱ्या राष्ट्राचे नाव सांगितले नसले तरी आयसिस नेता ठार झाल्याचे स्पष्ट केले आहे. फेरदाओस जिल्ह्य़ात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हा नेता मारला गेला, तर शहरातील इतर ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत १० जणांचा बळी गेला आहे. राका येथे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी सप्टेंबरपासून सातत्याने हवाई हल्ले करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सिरिया हवाई दल आणि रशियाच्या विमानांकडूनही अशा प्रकारे हल्ले करण्यात येत आहेत. रशियन प्रवासी विमान पाडल्याचा आयसिसवर आरोप करण्यात आल्यावर रशियाने आयसिसविरोधातील हल्ले थांबविले आहेत. या प्रांतात अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आयसिसचे ३२ दहशतवादी ठार झाले आहेत. जानेवारी २०१४ पासून या प्रांतावर आयसिसचे नियंत्रण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2015 3:46 am

Web Title: air strike at siriya killed 11 terrorist
टॅग Terrorist
Next Stories
1 तालिबान्यांच्या कंदहार विमानतळाला वेढा
2 दानशूरांचा (पूतनामावशी) कळवळा ‘पॅरिसचे हवाभान’
3 सदिच्छेपोटी राहुल यांच्या चपला हाती!
Just Now!
X