News Flash

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचे निधन

कृष्णराज राय यांचा कर्करोग बळावल्याने मृत्यू झाला असावा

ऐश्वर्या राय बच्चन बाबा कृष्णराज रायसोबत

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने लिलावती रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कृष्णराज राय यांचा कर्करोग बळावल्याने मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. पण प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. कृष्णराज राय यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 7:10 pm

Web Title: aishwarya rai bachchan father krishnaraj rai dies in mumbai
Next Stories
1 मानेसर ‘मारुती-सुझूकी’ हिंसाचार प्रकरणात १३ जणांना जन्मठेप
2 त्रिवेंद्रसिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री; काँग्रेसच्या चार माजी नेत्यांना मंत्रीपद
3 पॅरिस विमानतळावर थरार, सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकावून घेणारा ठार
Just Now!
X