अल काइदाचा भारतीय उपखंडातील कमांडर व त्याचे तीन साथीदार पाकिस्तानातील दक्षिण भागातील कराची शहरात करण्यात आलेल्या हल्ल्यात ठार झाले.
गुन्हे अन्वेषण शाखेने दिलेल्या माहितीनुसार अल काइदा इंडियन सब कंटिनंट (एक्यूआयएस)चा कमांडर सज्जाद ऊर्फ  कारगिल व त्याचे साथीदार यासिन ऊर्फ यासिर अराफत, महंमद हाशिम, शमीम ऊर्फ कमांडो यांचा दहशतवादविरोधी विभागाने टाकलेल्या छाप्यात मृत्यू झाला. आत्मघाती जॅकेट, हातबॉम्ब व इतर साहित्य तेथे सापडले. पोलिसांनी सांगितले, की एक्यूआयएसचा कमांडर हा मूळ बांगला देशचा होता. २००९ मध्ये तो पाकिस्तानात आला व त्यान वझिरीस्तानात अधिकाऱ्यांना लाच देऊन ओळखपत्र मिळवले होते. २०१४ मध्ये त्याल कराची शहराचा कमांडर नेमण्यात आले होते.