दिल्लीत मतदान केंद्राबाहेर काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये वादावादी झाली. संतापलेल्या अलका लांबा यांनी आप कार्यकर्त्याच्या कानाखाली मारण्यासाठी हातही उगारला. अलका लांबा यांच्या मुलावरुन वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या चिडल्या व आपच्या कार्यकर्त्याला मारण्यासाठी हात उगारला.

मंजू का तिला येथील मतदान केंद्राबाहेर शनिवारी ही घटना घडली. अलका लांब आपच्या कार्यकर्त्यावर धावून गेल्यानंतर तिथे असणाऱ्या पोलिसांनी हस्तक्षेप केला. अलका लांबा आधी आम आदमी पार्टीच्या आमदार होत्या. पण अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर त्या पक्षातून बाहेर पडल्या व काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या.

आता चांदनी चौक विधानसभा मतदारसंघातून त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्या मूळच्या काँग्रेसच्याच होत्या. पण २०१५ मध्ये आपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. अलका लांबा यांनी टागोर गार्डन येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. अलका लांबा यांच्यासमोर आपचे प्रल्हाद सिंह आणि भाजपाच्या सुमन गुप्ता यांचे आवाहन आहे.