News Flash

रावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

सध्या या मैदानात अनेक लोकांचा आक्रोश पाहायला मिळतो आहे

अमृतसरच्या चौडा बाजार परिसरात दसरा असल्याने रावण दहन आयोजित करण्यात आले होते. रावण दहन सुरु असतानाच एक ट्रेन मोठ्या वेगात या ठिकाणी आली. ज्या घटनेत ५० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होते आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर काटा अाणणारा हा व्हिडीओ आहे.

सध्या या मैदानात अनेक लोकांचा आक्रोश पाहायला मिळतो आहे. अत्यंत भीषण असा हा अपघात आहे. लोक संतापलेले आहेत, रडत आहेत आपल्या माणसांना शोधत आहेत. आपण त्याची फक्त कल्पना करू शकतो. ५० पेक्षा जास्त लोक मरण पावले असल्याची भीती व्यक्त होते आहे. अत्यंत वेगात ट्रेन आली आणि ती निघून गेली. या भीषण अपघातात ६० ते ७० लोकांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 8:52 pm

Web Title: amrutsar ravan dahan accident terrible video
Next Stories
1 अमृतसर रेल्वे दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची सरकारी मदत
2 ‘अपघात झाल्यावर नवज्योत कौर सिद्धू कारमध्ये बसून निघून गेल्या’
3 ‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार
Just Now!
X