News Flash

आठवी पास आमदारांची वार्षिक कमाई ८९ लाख ८८ हजार

महाराष्ट्र राज्य आमदारांच्या वार्षिक कमाईच्या यादीत दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

एखाद्या चांगल्या विद्यापिठांमधून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी घेऊन नोकरी शोधण्यास गेल्यास जास्तीत जास्त दहा लाख वार्षिक पगारावर त्याला नोकरी मिळण्याची शक्यता असते. त्यातूनही वाईट स्थिती इतर प्रकारच्या कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये आहे जिथे अगदी वर्षिक पगार दीड लाखांपासून ते पाच लाखांदरम्यान दिला जातो.

अनेकजण नोकरी करतानाच वेगवेगळ्या परिक्षा देऊन अधिक चांगली नोकरी आणि अर्थात जास्त पगार मिळावा म्हणून प्रयत्न करत असतात. भारतामध्ये अनेक तरुण तसेच मध्यमवयीन नोकरदार वर्ग कामाबरोबरच सतत कोणत्या ना कोणत्या परिक्षांच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात अधिक अधिक पैसे कसे कमवता येतील यासाठी प्रयत्नशील असतो. तर दुसरीकडे केवळ माध्यमिक शिक्षण घेतलेल्या आमदार वर्षाला ८९ लाख ८८ हजार रुपये कमवतात. ‘असोसिएट ऑर डेमोक्रॅटीक्स रिफॉर्म’ (एडीआर) आणि ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ यांनी सादर केलेल्या एका अहवालामध्ये सामान्य भारतीय आणि भारतातील आमदारांच्या वार्षिक कमाईमधील फरक खूप मोठा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे कर्नाटकमधील आमदार सर्वाधिक म्हणजेच एक कोटीहून अधिक कमाई करतात. त्या खालोखाल महाराष्ट्रातील आमदारांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील आमदारांचे वर्षिक कमाई ४३ लाख ४० हजार इतकी आहे.

हा अहवाल सादर करण्यासाठी ‘एडीआर’ने देशामधील ४ हजार ८६ आमदारांपैकी ३ हजार १४५ आमदरांनी निवडणुकांच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधील तपशील तपासून पाहिला आहे. ४ हजार ८६ आमदारांपैकी ९४१ आमदारांनी उत्पनाचे स्त्रोत जाहीर केले नसल्याने त्यांचा या अहवालामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

कर्नाटकमधील आमदारांची कमाई सर्वाधिक

वेगवेगळ्या राज्यांमधील आमदारांचे वार्षिक वेतन वेगवेगळे आहेत. कर्नाटकमधील आमदारांना सर्वाधिक म्हणजेच एक कोटीहून अधिक कमाई होते. तर छत्तीसगडमधील आमदारांची सर्वात कमी म्हणजे ५ लाख ४० हजार इतकी वर्षिक कमाई होते. देशातील पूर्वेमधील राज्यांमधील आमदारांना सर्वात कमी वेतन मिळते. पूर्वेकडील राज्यांमध्ये एकूण ६१४ आमदार असून त्यांची सरासरी वार्षिक कमाई ८ लाख ५३ हजार इतकी आहे.

अहवालातून समोर आलेली आकडेवारी

>
३ हजार १४५ आमदरांपैकी अर्ध्याहून अधिक आमदारांनी त्यांच्या कमाई मुख्य कार्यक्षेत्र हे शेती किंवा उद्योगधंदा असल्याचे सांगितले आहे.
>
२५ टक्के आमदारांनी आपण व्यवसायिक असल्याचे सांगितले आहे.
>
२४ आमदारांनी आपण पेश्याने शेतकरी असल्याचे सांगितले आहे.
>
दक्षिणेकडील राज्यांमधील ७११ आमदरांचे सरासरी वार्षिक कमाई सर्वाधिक म्हणजेच ५१ लाख ९९ हजार इतकी आहे.
>
प्रतिज्ञापत्रामध्ये अशिक्षित असल्याचे सांगणाऱ्या आमदारांचीही वार्षिक कमाई ९ लाख ३१ हजार इतकी आहे.
>
विशेष म्हणजे पुरुष आमदार आणि स्त्री आमदारांच्या कमाईमध्येही मोठा फरक असल्याचे या अभ्यासामध्ये दिसून आले आहे.
>
पुरुष आमदारांची वार्षिक कमाई ही महिला आमदारांच्या कामाईपेक्षा दुप्पट आहे.
>
कर्नाटकमधील २०३ आमदारांची वार्षिक कमाई सर्वाधिक म्हणजेच एक कोटी ११ लाख ४० हजार इतकी आहे.
>
त्या खालोखाल महाराष्ट्रातील आमदारांचा क्रमांक सर्वाधिक कमाई असणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये होतो. महाराष्ट्रातील आमदारांची वर्षिक कमाई ४३ लाख ४० हजार इतकी आहे.
>
अभ्यास करण्यात आलेल्या छत्तीसगडमधील ६३ आमदारांची वार्षिक कमाई सर्वात कमी म्हणजेच ५ लाख ४० हजार इतकी आहे.
>
सर्वात कमी वर्षिक कमाई असणाऱ्या आमदरांच्या यादीमध्ये झारखंडच्या आमदारांचा दुसरा क्रमांक लागतो. अभ्यास करण्यात आलेल्या झारखंडमधील ७२ आमदरांची वार्षिक कमाई ७ लाख ४० हजार इतकी आहे.
>
३ हजार १४५ आमदरांपैकी एक टक्का आमदार हे अभिनय तसेच सिने-निर्मिती क्षेत्राशी संबंधित आहेत.
>
भारतात राजकारण हे सर्वाधिक कमाई असणाऱ्या अव्वल चार पेशांपैकी एक आहे. सर्वात कमी कमाई असणाऱ्या पेशांमध्ये गृहिणी, शिक्षक, निवृत्त अधिकारी आणि वकीली पेशाचा समावेश होतो.

शिक्षण

>
३ हजार १४५ आमदरांपैकी १ हजार ५२ आमदरांनी आपले शिक्षण इयत्ता पाचवी ते बारावीच्या दरम्यान असल्याचे म्हटले आहे. या आमदारांची वार्षिक कमाई ३१ लाख ३ हजार रुपये इतकी आहे.
>
तर एकूण आमदार संख्येपैकी ६३ टक्के म्हणजेच १ हजार ९९७ आमदरांनी आपले शिक्षण हे पदवी आणि त्यापुढील असल्याचे सांगितले असून त्यांची वर्षिक कमाई २० लाख ८७ हजार इतकी आहे.
>
आपण आठवी पास असल्याचे सांगणाऱ्या १३९ आमदरांची स्वत:ची वार्षिक कमाई ही ८९ लाख ८८ हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.

मागण्या
इन्कम टॅक्स रिटर्नस भरले असतील नसतील तरी आमदरांना त्यांचे वार्षिक उत्पन्न जाहीर करणे बंधनकारक असायला हवे अशी मागणी ‘असोसिएट ऑर डेमोक्रॅटीक्स रिफॉर्म’ने केली आहे. तसेच आमदरांना कोणत्या उद्योगातून किती उत्पन्न मिळते याचा संपूर्ण तपशील त्यांनी द्यावा अशीही मागणी या संस्थेने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 6:15 pm

Web Title: analysis of income age and profession of sitting mlas
Next Stories
1 ‘इन्फोसिसने माजी सीएफओंना १२.१७ कोटी रूपये द्यावेत’
2 भाजपा खासदार मनोज तिवारी यांच्या विरोधात FIR
3 गोळी मारणार असाल तर मारा, प्रश्न विचारु नका; शहीद जवानाचं दहशतवाद्यांना उत्तर
Just Now!
X