देशात सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे. प्रशासनाकडून सर्वत्र सर्व माध्यमांद्वारे नागरिकांनी दक्षता घ्यावी, करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे यासाठी जनजागृती देखील केली जात आहे. यासाठी बऱ्याचदा क्रिएटिव्ह व वेगवेगळ्या युक्त्या देखील वापरल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी केलेली एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत असून, तुफान व्हायरल होत आहे.

दिल्ली पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांसाठी, नियमांचे पालन न करणाऱ्यांसाठी आपल्या ट्विटरद्वारे एक मजेशीर पोस्ट शेअऱ केली आहे.

जेव्हा दिल्ली पोलिसांना मास्क न घातलेली लोकं इतरत्र फिरताना दिसतात तेव्हा आमची प्रतिक्रिया “कोण है ये लोग, कहाँ से आते है”…. ‘जॉली एलएलबी’ या हिंदी चित्रपटातील संवादासारखी असते. असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
आपल्या या पोस्टबरोबरच दिल्ली पोलिसांनी ”जेव्हा तुम्ही घराबाहेर असाल तेव्हा मास्क घालणं विसरू नका, #WearAMask #StaySafe.” असं संदेश देखील दिला आहे.

दिल्ली पोलिसांनी केलेल्या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत व ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
एकाने त्याच्या लहानपणी त्याला दिल्ली पोलिसांचा आलेला अनुभव शेअर करत, दिल्ली पोलीस अतिशय दयाळू असल्याचं म्हटलं आहे. तर, काहींनी मजेशीर ट्विट देखील केले आहेत.