14 August 2020

News Flash

पुलवामा हल्ल्याप्रकरणी आणखी एकाला अटक

या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता सात झाली आहे.

संग्रहित छायाचित्र

पुलवामा जिल्ह्य़ात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी पुलवामातील एका नागरिकाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुलवामा जिल्ह्य़ातील काकपोराचा रहिवासी असलेल्या बिलाल अहमद कुचे याला एनआयएने अटक केली असून तो लाकूड कापण्याच्या कारखान्याचा मालक आहे. बिलालला अटक करण्यात आल्याने या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता सात झाली आहे. बिलालची १० दिवसांच्या एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:36 am

Web Title: another arrested in pulwama attack abn 97
Next Stories
1 भारतात करोना मृत्यूदर सर्वात कमी
2 कानपूर चकमकीची दंडाधिकारी चौकशी
3 प्रियंका गांधी-वढेरा यांची उत्तर प्रदेश सरकारवर टीका
Just Now!
X