News Flash

गायीच्या शेणापासून बनवलेली चिप कमी करणार मोबाईल रेडिएशन; कामधेनू आयोगाचा दावा

गौसत्व कवच असं या चिपचं नाव आहे

अंटी रेडिएशन चिप दाखवताना कामधेनू आयोगाचे अध्यक्ष.

गौमूत्र आणि शेणाचे अनेक फायदे अनेकांना माहितीच आहे. पण, गायीच्या शेणापासून आता चक्क अँटी रेडिएशन चिप तयार करण्यात आली आहे. ही चिप मोबाईलसाठी वापरता येणार आहे. हे आजारांविरोधात ढाल असल्याचा दावा कामधेनू आयोगानं केला आहे.

कामधेनू आयोगानं गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा केला आहे. “गायीचं शेण सगळ्यांना सुरक्षित ठेवेल. गायीचं शेण हे रेडिएशन विरोधी असल्याचं वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेलं आहे. गायीच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईलमध्येही वापरता येऊ शकते. आजारांविरोधात हे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे,” असा दावा कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया यांनी केला आहे.

कथीरिया म्हणाले,” गायीच्या शेणापासून रेडिएशन कमी करण्यास मदत होते. ही एक अँटी रेडिएशन चिप आहे. आम्हाला असं दिसून आलं आहे की, ही चिप मोबाईलमध्ये ठेवल्यास रेडिएशन कमी होते. तुम्हाला जर आजारांपासून दूर राहायचं असेल, तर याचा वापर करू शकता,” असं ते म्हणाले. या अँटी रेडिएशन चिपचं नाव गौसत्व कवच असं आहे. ही चिप राजकोटमधील श्रीजी गौशाळेत तयार करण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 8:53 am

Web Title: anti radiation chip used in mobile phones vallabhbhai kathiria bmh 90
Next Stories
1 हाथरस प्रकरण : “तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…”; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
2 जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं करोना लशीच्या चाचण्या थांबवल्या; स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम
3 हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची न्यायालयात हजेरी
Just Now!
X