काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी तृतीयपंथीय कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. अप्सरा रेड्डी असं त्यांचं नाव असून त्या तामिळनाडूच्या आहेत. नवी दिल्ली येथे मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी महिला काँग्रेसच्या प्रमुख सुश्मीता देव उपस्थित होत्या. अप्सरा रेड्डी यांनी सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार म्हणून लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची अनेक प्रकरणं बाहेर काढली.

अप्सरा रेड्डी यांनी तृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामं केली आहेत. महिला, तृतीयपंथी, लहान मुलं यांच्या सामाजिक प्रश्नांवर अधिक जोमानं काम करणार असल्याचे मच यावेळी रेड्डी यांनी व्यक्त केले.

काही वर्षांपूर्वी त्या भाजपमध्ये सामील झाल्या होत्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र महिनाभरातच त्यांनी भाजपला राम राम केला.