News Flash

जम्मू-काश्मीर : ‘लष्कर ए तोयबा’चा दहशतवादी पकडला

मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील हंडवारा पोलिसांनी भारतीय लष्कराच्या ३२ आरआर आणि सीआरपीएफच्या ९२ बटालियनसोबत राबवलेल्या संयुक्त मोहीमेत लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यास अटक केली आहे. यावेळी या दहशतवाद्याकडून शस्त्र व दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे.

या अगोदर १९ सप्टेंबर रोजी जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात जवानांना यश आलं होतं. तेव्हा देखील त्या दहशतवाद्यांकडून रोख रक्कमेसह मोठ्याप्रमाणावर दारूगोळा व शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता.

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचा संपूर्णपणे नायनाट करण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलीस व लष्करी जवानांकडून सातत्याने विशेष मोहीम राबवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 6:16 pm

Web Title: arrested one terror associate of lashkar e toiba msr 87
Next Stories
1 प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च ८० हजार कोटी, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? – अदर पूनावाला
2 पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान
3 भाजपाची नवी टीम जाहीर; तेजस्वी सूर्या युवा मोर्चा अध्यक्ष, मुकुल रॉय राष्ट्रीय उपाध्यक्षपदी
Just Now!
X