‘यंत्रमानव पत्रकाराचा’ आर्थिक विषयावरचा लेख प्रसिद्ध
चीनमध्ये गेल्या आठवडय़ात एका वेगळ्याच घटनेत एका यंत्रमानव म्हणजे रोबोटने लिहिलेली बातमी प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी उद्योगविषयक असल्याचे समजते. चीनमध्ये आधीच वर्तमानपत्रे सत्ताधारी पक्षाच्या नियंत्रणाखाली आहेत त्यामुळे सरकारला हव्या तशा बातम्या मिळाल्या तर मानवी पत्रकारांची गरज उरणार नाही, या भीतीने तेथील पत्रकारांच्या पोटात भीतीने गोळा उठला आहे. चीनमधील सोशल व गेमिंग क्षेत्रातील कंपनी टेनसेंटने त्यांच्या कंपनीविषयीचा ९१६ शब्दांचा लेख ‘क्यूक्यू डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून हा लेख प्रसिद्ध केल्याचे हाँगकाँग येथील साउथ चायना मॉर्निग पोस्टने म्हटले आहे. हा लेख अतिशय वाचनीय असून तो मानवाने लिहिलेला नाही असे म्हणता येण्यासारखी स्थिती नाही, असे पोस्टचे वातार्हर ले वेई यांनी म्हटले आहे .
हा लेख चिनी भाषेत असून तो ‘ड्रीमरायटर’ या टेनसेंटच्या रोबोटने एका मिनिटात लिहून पूर्ण केला आहे. त्यात काही आर्थिक बाबी जड गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरूवारी रोबोटने लिहिलेला लेख हा चीनच्या ऑगस्टमधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आहे. या लेखात चीनचे आर्थिक भवितव्य व दीर्घकालीन मोठय़ा आर्थिक वाढीनंतरची मंदी याची चर्चा केली आहे. रोबोट पत्रकाराविषयी ऐकून होतो पण ते अमेरिकेत व युरोपमध्ये असतील असे आपणास वाटले होते,असे ली म्हणाले. आता ली यांच्या मते सर्वाच्या पोटात भीतीचा गोळा असून मानवी पत्रकार रोबोट पत्रकाराशी स्पर्धा करू शकत नाही. स्थानिक चिनी पत्रकारांच्या पोटावर त्यामुळे पाय येणार असून साध्या भाषेत नवीन बातम्या ते देऊ शक तात, असे वू डेकाई या हाँगकाँग विद्यापीठातील माजी सहायक प्राध्यापकाने म्हटले आहे. चिनी भाषेतही हे करता येईल असे वू यांचे मत आहे. रोबोटना अलगॉरिथम दिले तर ते माहिती व अवतरणे घेऊन लेख लिहू शकतात, ते ऑनलाईन टाकतात. रोबोट पत्रकार सुटी घेत नाहीत, वेळा चुकवित नाहीत व स्चच्छ, अतिशय चांगली अभ्यासपूर्ण बातमी, लेख ७ डॉलरला लिहून देतात; ही अमेरिकेतील स्थिती आहे. त्यातील अलगॉरिथम लेख किंवा बातमीतील चुकाही सांगता,े त्यामुळे अचूकताही असते.

यंत्रमानव पत्रकार
’अलगॉरिथमच्या मदतीने एक मिनिटात लेख लिहितो.
’प्रादेशिक भाषेतही लेख लिहिणे शक्य.
’चीनमध्ये टेनसेंटच्या ड्रीमरायटरने १ मिनिटात लेख लिहिला.
’अचूकता अधिक, सुटय़ा घेत नाही.
’अमेरिकेत यंत्रमानव ७ डॉलरला लेख किंवा बातमी लिहून देतात.