जर्मन वैज्ञानिकांनी कृत्रिम अस्थिमज्जेची निर्मिती केली असून त्याच्या मदतीने स्कंदपेशींची (मूलपेशी) संख्या वाढवता येते. परिणामी त्याचा उपयोग रक्ताचा कर्करोग (ल्यूकेमिया) बरा करण्यासाठी होणार आहे. ही कृत्रिम अस्थिमज्जा म्हणजे एक सच्छिद्र घटक असून त्यात नैसर्गिक अस्थिमज्जेचे (मगज) गुणधर्म आहेत व त्याचा वापर प्रयोगशाळेत स्कंदपेशी वाढवण्यासाठी करता येणार आहे. संशोधकांच्या मते कालांतराने रक्ताचा कर्करोग बरा करण्यासाठी या कृत्रिम अस्थिमज्जेचा उपयोग होईल.
कार्लश्रुहे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट फॉर इंटेलिजंट सिस्टीम्स, स्टुटगार्ट व तुबीगेन युनिव्हर्सिटी या तीन संस्थांनी या कृत्रिम अस्थिमज्जेची निर्मिती केली असून त्यात मूलपेशींची संख्या वाढत जाते. एरिथ्रोसाईट्स किंवा प्रतिरक्षा पेशी सारख्या रक्तातील पेशींचा पुरवाठा हेमाटोपोइटिक मूलपेशींकडून केला जात असतो व  हेमाटोपोइटिक मूलपेशी अस्थिमज्जेत तयार होत असतात त्यांचे कार्य बिघडले तर रक्तविकार होतात.  हेमाटोपोइटिक मूलपेशी या रक्ताच्या कर्करोगावर उपचारासाठी वापरता येऊ शकतात. रक्ताचा कर्करोग झालेल्या व्यक्तीत बाधित पेशींच्या जागी आरोग्यवान व्यक्तीच्या हेमाटोपोइटिक मूलपेशी वापरल्या जातात अर्थात त्यासाठी योग्य दाता मिळणे आवश्यक असते.
सध्यातरी या पेशी त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणात त्यांचे गुणधर्म पाळतात. या प्रश्नावर उत्तर म्हणून वैज्ञानिकांनी नैसर्गिक अस्थिमज्जेचे गुणधर्म प्रयोगशाळेत निर्माण करता येतात. कृत्रिम बहुलक तयार करणाऱ्या वैज्ञानिकांनी हाडाच्या आकारासारखी स्पंजासारखी एक रचना तयार केली त्यात रक्तनिर्मिती करणाऱ्या अस्थिमज्जेची नक्कल केलेली आहे. त्यांनी त्यासाठी अस्थिमज्जेत असतात तसेच मॅट्रिक्स प्रथिनांच्या मदतीने तयार केले. नाळेच्या रक्तातील मूलपेशी या कृत्रिम अस्थिमज्जेत आणल्या असतात त्यांची संख्या काही दिवसात वाढल्याचे दिसून आले. याचाच अर्थ कृत्रिम अस्थिमज्जेत मूलपेशींची पुनर्निर्मिती झाली.