१०.१५ जनलोकपाल विधेयक मांडण्यावर आप ठाम. मात्र नायब राज्यपाल नजीब जंग यांचे विधानसभा अध्यक्ष एमएस धीर यांना विधेयक मांडू न देण्याचा आदेश देणारे पत्र.
११.०५ ‘आप’मध्येच मतभेद. कायदेशीर बाबींचे पालन करूनच विधेयक मांडण्याची अशोक अगरवाल यांची मागणी.
१.३० विधेयकाला विरोध पण आपचा पाठिंबा काढला नसल्याचे काँग्रेसचे नेते अरविंदर सिंग लवली यांचे प्रतिपादन.
२.५५ नायब राज्यपालांचे पत्र पटलावर ठेवण्याची भाजपची मागणी.
३.०० काँग्रेस व भाजप सदस्यांच्या गदारोळानंतर सभागृह २० मिनिटांसाठी तहकूब.
३.१० विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात सर्वपक्षीय बैठक.
३.२५ कामकाज सुरू. अध्यक्षांनी राज्यपालांचे पत्र वाचून दाखविले. त्या पत्रावर मतदान घेण्याची भाजप, काँग्रेसची मागणी. मतदान हवे तर मग चर्चाही होऊ द्या, आपची मागणी. राज्यपालांच्या आदेशावर चर्चा होऊ शकत नसल्याचा काँग्रेस, भाजपचा दावा. घटनेत तसे म्हटले आहे का, या प्रश्नावर मात्र भाजप, काँग्रेस निरूत्तर. मतदानाची मागणी सरकारने फेटाळली.
३.५० गदारोळातच जनलोकपाल विधेयक मांडल्याची केजरीवाल यांची घोषणा. आप सदस्यांनी बाके वाजवली. अध्यक्षांच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस सरसावली.
५.०० विधेयक मांडू देण्यास ४२ सदस्यांचा विरोध आणि २७ जणांचा पाठिंबा असल्याने विधेयक मांडले जाणार नसल्याची विधानसभा अध्यक्षांची घोषणा.
६.३० केजरीवाल यांचे विधानसभेत भाषण. ‘माझ्या सरकारचे हे अखेरचे अधिवेशन असावे. जनलोकपालसाठी हजारदा मुख्यमंत्रीपद त्यागण्यास तयार आहे. मुकेश अंबानींविरोधात तक्रार केल्यानेच भाजप आणि काँग्रेसने विधेयक रोखले आहे.’
७.५० केजरीवाल यांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा.
८.३० केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांसमोर भाषण.
८.४० राजीनामा देण्यासाठी केजरीवाल राज्यपालांच्या भेटीस.
८.४५ जनलोकपाल मांडले न जाणे आणि केजरीवाल यांचा राजीनामा हे दोन्ही दु:खद आहे – अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया.