देशात अल्पसंख्याक दहशतीत जगत आहेत, हे जर पंतप्रधान मोदींना मान्य आहे. तर, त्यांना हे देखील माहिती असायला हवे की अखलाखची हत्या करणारे निवडणुकीताल प्रचारसभांदरम्यान जनतेसमोरच बसले होते. जर पंतप्रधानांना खरच असे वाटत असेल की लोक दहशतीत आहेत. तर मग ते अशा लोकांचा बंदोबस्त करतील का? जे गायींच्या नावावर मुस्लिमांना मारतात, आमचे व्हिडीओ तयार करून आम्हाला कमी लेखतात. असे म्हणत एआयएमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

ओवेसी यांनी म्हटले की, जर मुसलमान खरोखरच दहशतीत आहेत, तर पंतप्रधान आम्हाला सांगू शकतात का? की त्यांच्या पक्षाचे ३०० पैकी किती खासदार मुस्लिम आहेत जे लोकसभेद्वारे निवडल्या गेले? हा तोच खोटारडेपणा व विरोधीभास आहे, जो पाज वर्षांपासून पंतप्रधान व त्यांचा पक्ष करत आलेला आहे.

या अगोदर शनिवारी ओवेसी यांनी म्हटले होते की, निश्चितच हा भाजपासाठी मोठा विजय आहे. मात्र, या निर्णयानंतर हे स्पष्ट आहे की आता मुस्लिमांना समाजातून वेगळे केले जाईल.