19 September 2020

News Flash

त्यांच्यालेखी आम्ही माणसं नाही – ओवेसींची संतप्त प्रतिक्रिया

बिहारमधल्या बेगुसरायमध्ये धर्माच्या नावावर हिंसा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी

बिहारमधल्या बेगुसरायमध्ये धर्माच्या नावावर हिंसा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील मोहम्मद कासिम या मुस्लीम तरुणाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. त्या तरूणाचा एक व्हिडीओ एआयएमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रीट्वीट करत भाजपा नेतृत्वाला लक्ष केलं आहे. त्यांच्यालेखी आम्ही माणसं नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया ओवेसींनी दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी आम्हाला पाकिस्तानशी जोडून आमचं नेहमीच खच्चीकरण केलं आहे, असेही ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

मुस्लिमांविरोधात आणखी एक हिंसक घटना घडली आहे. बिहारमधल्या बेगुसरायमध्येमध्ये एका मुस्लीम फेरीवाल्याला गोळी मारली आहे. मोहम्मद कासिमने आपलं नाव सांगून मृत्यूला आंत्रण दिले होते. पण मला खरेच भीती वाटत आहे. हा वेडेपणा नेमका येतो कसा? त्यातच भाजपा नेतृत्वामध्ये आम्हाला पाकिस्तानशी जोडले आहे. त्यांच्यालेखी आम्ही माणसं नाहीत का? असे ओवेसी म्हणाले.

रविवारी बिहारमधल्या बेगुसरायमध्येमध्ये ही घटना घडल्याचे समजतेय. हा हल्ला करणाऱ्याचं नाव राजीव यादव असं आहे. हल्ला झालेल्या मुस्लीम तरुणाने आपल्यावरच्या हल्ल्याबद्दल एका व्हिडिओमध्ये सांगितलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोहम्मद कासिम या तरुणाला हल्लेखोर राजीव यादवने त्याचं नाव विचारलं. या तरुणाने नाव सांगितल्यावर, मग तू पाकिस्तानला जा, अशा शब्दात हल्लेखोर त्याच्यावर ओरडला आणि त्याने त्याच्या दिशेने गोळी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 5:37 pm

Web Title: asaduddin owaisi responds to muslim hawker shot at in begusarai tweet says were not human in their eyes
Next Stories
1 हवाईदल प्रमुखांकडून कारगिलमधील शहीदांना अनोखी श्रद्धांजली
2 रडारबाबत मोदींचं विधान योग्य – एअर मार्शल नंबियार
3 चिट फंड घोटाळा : राजीव कुमार सीबीआयसमोर गैरहजर
Just Now!
X