News Flash

आसाम हादरले; भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी इमारतींना तडे

६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक ठिकाणी पडझड

भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारतींना तडे गेले असून, पडझडही झाली आहे. (Himanta Biswa Sarma/twitter)

आसामसह पूर्वेकडील काही राज्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. आसामच्या सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी लागोपाठ दोन झटके जाणवले. त्यामुळे लोक आपापल्या घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. आसामच्या मुख्यमंत्री सोनभद्र सोनवाल हे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. पहिल्या तीव्र झटक्यानंतर नंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले. एक ७ वाजून ५५ मिनिटाला तर त्यानंतर थोड्या वेळाने दुसरा. भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता पहिल्या धक्क्याच्या तुलनेत कमी होती. ७ वाजून ५५ बसलेला झटका ४.३ रिश्टर स्केल, तर दुसरा ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

आसामला भूकंपाचा मोठा झटका बसला आहे. सर्वजण सुखरूप असतील अशी मी प्रार्थना करतो आणि नागरिकांनी सतर्क राहावं. सर्व जिल्ह्यांचा आढाव घेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सोनवाल यांनी दिली. भाजपाचे आसाममधील नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनीही ट्विट करून भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याची माहिती दिली. शर्मा यांनी काही फोटोही ट्विट केले आहेत.

अरुणाचल प्रदेशचे डीआयजीपी मधूर वर्मा यांनीही भूकंपासंदर्भात ट्विट केलं आहे. इटानगरमध्येही मोठ्या तीव्रतेचे झटके जाणवले असून, घरं पूर्ण हादरली होती. जवळपास ३० सेंकट भूकंपाचे झटके जाणवले. कुठलीही जीवितहानी झाली नसून, सर्वांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एनडीआरएफने दिलेल्या माहितीप्रमाणे गुवहाटी आणि तेजपूरमधील इमारतींना तडे गेले आहे. मात्र, सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आसाम, अरुणाचल प्रदेशबरोबरच उत्तर बंगालमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. जवळपास ३० सेंकद हादरे जाणवल्याचं वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 8:44 am

Web Title: assam earthquake magnitude quake 6 7 richter scale jolted two aftershocks jolt assam bmh 90
Next Stories
1 “माय लॉर्ड! आता त्यांच्या स्वातंत्र्यास, निष्पक्षपातीपणास मालक व बाप निर्माण झालेत”
2 स्वार्थासाठीच विकसित देशांकडून ‘लस राष्ट्रवाद’ म्यान
3 रशियाची लस मेअखेरीस भारतात
Just Now!
X