मणिपूरमध्ये भाजपला पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश, पंजाब, गोव्यात आपची मुसंडी

चार राज्याच्या निवडणुका आटोपल्या असून पंजाब, गोवा वगळाता भाजपने सर्वच ठिकाणी लक्षवेधी यश मिळविले आहेत. सर्वाधिक चर्चेत ठरलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता प क्षाने एकूण मतांपैकी ३९ टक्के मते प्राप्त करून तब्बल ३१२ जागा जिंकल्या. पंजाबमध्ये मात्र पक्षाची दयनीय अवस्था झाली. येथे काँग्रेसने ३८ टक्के मते प्राप्त करून पुन्हा सत्ता काबीज केलीय येथे भाजपला केवळ ५.४ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशमध्ये जी हालत काँग्रेसची झाली (फक्त सात जागा) तीच गत पंजाबमध्ये भाजपची झाली ( ३ जागा) उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुकीत मतविभाजन झाल्याचे मतदानाचे आकडे सांगतात. भाजप -३९.७ टक्के (३४४०३०३९ मते), बीएसपी-२२.२ टक्के (१९२८१३५२ मते), समाजवादी पार्टी-२१.८ टक्के(१८९२३६८९ मते), काँग्रेस -२टक्के(५४१६३२४ मते), आयएनडी-२.६ टक्के (२२२९४४८  मते),राष्ट्रीय लोकदल-१.८ टक्के (१५४५८१० मते) तर अपना दल-१ टक्का(८५१३३६ मते) प्राप्त झाली. काँग्रेस, सपा आणि बसपा या तीनही पक्षांची एकूण टक्केवारी ही ४५ टक्के होते.

पंजाबमध्ये काँग्रेस दहा वर्षांने पुन्हा सत्तेत आली आहे. येथे दहा वर्ष भाजप आणि अकाली दल युतीची सत्ता होती. आम आदमी पार्टीने प्रथमच येथे निवडणूक रिंगणात प्रवेश केला होता. या मानाने प्रस्थापितांना बाजूला सारून आपने मिळविलेली दुसऱ्या क्रमांकाची मते सर्वाचे लक्ष वेधणारी ठरली आहे. येथे काँग्रेसने -३८.५ टक्के मते घेऊन पूर्ण बहुमत मिळविले आहे. सत्ताधारी अकाली दलाला २५.२ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. आपला अकाली दलापेक्षा किंचित कमी म्हणजे-२३.७ टक्के मते आहेत पण त्यांच्या जागा अकाली दलापेक्षा पाचने जास्त (२०) आहे. भाजपला भााजप-५.४ टक्के, अपक्ष-२.१ टक्को व एलआयपीला १.२ टक्के मतांचा कौल मिळाला आहे.

गोवा विधानसभेची निवडणूकही चुरशीची झाली. आपमुळे येथे तिरंगी लढत झाली. सत्ताधारी भाजप , काँग्रेस आणि आप असा तिहेरी सामाना झाला. येथे भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त मते असली तरी जागा मात्र कमी आहे. भाजप-३२.५ टक्के, काँग्रेस-२८.४ टक्के तर आम आदमी पार्टीला ६.३ टक्के मते मिळाली आहे. मणिपूर विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात भाजपने घेतलेली मते आणि जागांची भरारी राजकीय  पक्षांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. येथे भाजपला ३६.३ टक्के(६०१५२७ मते), काँग्रेसला-३५.१ टक्के( ५८१८६९ मते) मते मिळाली.