14 December 2017

News Flash

पाकिस्तानातील पेशावर आंतराष्ट्रीय विमानतळावर राँकेट हल्ला

पेशावर विमानतळावर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दहशतवाद्यांमार्फत अज्ञातस्थळावरून पाच राँकेट डागण्यात आली. या राँकेट

पेशावर | Updated: December 16, 2012 12:28 PM

हल्ल्यात १० ठार, ४० जखमी

पेशावर विमानतळावर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दहशतवाद्यांमार्फत अज्ञातस्थळावरून पाच राँकेट डागण्यात आली. या राँकेट हल्ल्यात पाच दहशतवाद्यांसह दहा जण ठार तर ४० जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी पोलिसांनी विमानतळाच्या परिसरात नाकाबंदी केली आहे. तर पेशावर विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळावर सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक देखील सुरु होती. या घटनेनंतर पाकिस्तानातील इतर महत्त्वाच्या विमानतळावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर संपूर्ण पेशावर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.  

First Published on December 16, 2012 12:28 pm

Web Title: attack on pakistanpeshvar air port