News Flash

फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

सुषमा अंधारे जखमी झाल्या असून त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर मार लागला आहे.

फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. मध्यप्रदेशातील इंदूर येथे हा हल्ला करण्यात आला. इंदूरपासून 15 किलोमीटर अंतरावर घटना घडली आहे. सुषमा अंधारे एका कार्यक्रमातून परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सुषमा अंधारे जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

बुधवारी रात्री सुषमा अंधारे कार्यक्रमातून परतत असताना रात्री एका गाडीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या गाडीवर कोणतीही नंबर प्लेट नव्हती. हल्लेखोरांनी तीनवेळा गाडी सुषमा अंधारे यांच्या गाडीला धडक दिली. सुषमा अंधारे जखमी झाल्या असून त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर मार लागला आहे.

हल्ला झाला तेव्हा अंधार असल्या कारणाने हल्लेखोर नेमके किती आणि कोण होते याचा अंदाज येऊ शकला नाही. सध्या हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 11:01 pm

Web Title: attack on sushma andhare in indore
Next Stories
1 उत्तर प्रदेश आणि राजस्थानात वाळूचं भयानक वादळ, १०९ जणांचा मृत्यू
2 कसौलीत महिला अधिकाऱ्याची पाठलाग करुन हत्या, आरोपीला मथुरेतून अटक
3 महिलेने शब्द पाळला; आठ दिव्यांग मुलं घेतली दत्तक
Just Now!
X