अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या राजकीय प्रवासापासून ते खासगी गोष्टींपर्यंत अनेक गोष्टींवर ओबामा यांनी भाष्य केलेलं पुस्तक सध्या भारतातही चांगलेच चर्चेत आहे. याच पुस्तकामध्ये भारतीय काँग्रेससंदर्भात ओबामा यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र याच पुस्तकामध्ये ओबामा यांनी आपले बालपण हे रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत गेल्याचे म्हटले आहे. भारत आणि तेथील संस्कृतीबद्दल आपल्या मनात कायम विशेष स्थान राहिलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इंडोनेशियामध्ये बालपण गेलं असून तिथे मी बालपणी रामायण, महाभारतामधील गोष्टी अनेकदा ऐकल्याचा उल्लेख ओबामांनी केला आहे.

“भारताचे आकारमान आणि जागतिक लोकसंख्येपैकी प्रत्येक सहावी व्यक्ती या देशात रहात असल्याने, वेगवेगळ्या वंशाचे दोन हजारहून अधिक संस्कृती आणि सातशेहून अधिक भाषा बोलला जाणारा हा देश असल्याने त्याचा अधिक प्रभाव दिसून येतो,” असं ओबामा यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून २०१० साली आपण भारताला पहिल्यांदा भेट दिली. त्यापूर्वी आपण कधीही भारतामध्ये गेलो नव्हतो मात्र भारत देशाला माझ्या मनात कायमच विशेष स्थान होतं, असं ओबामा यांनी म्हटलं आहे.

elon musk postpones trip to india
‘टेस्ला’चे मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर; वर्षअखेरीस भेटीचे सुतोवाच
international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Is Electoral Bonds Watergate in India
निवडणूक रोखे हे भारतातील वॉटरगेट?
eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?

भारताबद्दल विशेष प्रेम आसण्यामागे इंडोनेशियामधील आपल्या बालपणीच्या आठवणींचा मोठा वाटा असल्याचेही ओबामा यांनी म्हटलं आहे. “कदाचित माझ्या बालपणातील काही काळ मी इंडोनेशियामध्ये घालवला तेव्हा मी रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकल्या म्हणून अथवा पाश्चिमात्य देशांमधील धर्मांबद्दल असणारं आकर्षणामुळे हे झालं असावं. किंवा माझ्या पाकिस्तानी आणि भारतीय मित्रांमुळे ज्यांनी मला डाळ आणि खिमासारख्या रेसिपी शिकवल्या किंवा मला बॉलिवूडमधील चित्रपटांशी ओळख करुन दिली,” असं ओबामांनी पुस्तकामध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘जो बायडेन लादेनवर हल्ला करण्याच्या विरोधात होते’ ओबामांचा खळबळजनक खुलासा

‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकामध्ये ओबामांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. अगदी ओसामा बिन लादेनच्या खात्म्यापासून ते जगभरातील राजकीय नेत्यांबद्दलचे आपले मत ओबामा यांनी या पुस्तकामध्ये मांडले आहे. दोन भागांमध्ये येणाऱ्या पुस्तकाचा पहिला भाग मंगळवारी प्रकाशित झाला आहे.