पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज लॉकडाउन ४ ची घोषणा करण्यात आली. मात्र त्यांनी याचे नियम हे पूर्णपणे वेगळे असतील जे तुम्हाला १८ मे पूर्वी कळवण्यात येतील असं पंतप्रधानांनी सांगितलं. आज देशाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला त्यावेळी लॉकडाउन ४ ची त्यांनी घोषणा केली. मात्र याचे नियम या लॉकडाउनचं स्वरुप हे वेगळं असेल असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. आज करोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेजही जाहीर केलं. तसंच आत्मनिर्भर भारत हा नाराही दिला.

राज्यांनी लॉकडाउन संदर्भात काही सूचना केल्या आहेत. काही मतं मांडली आहेत. त्यानुसार लॉकडाउनचं स्वरुप असेल. ते नेमकं काय आणि कसं असेल ते १८ मेपूर्वी स्पष्ट करण्यात येईल असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यामुळे लॉकडाउन ४ होणार हे नक्की मात्र तो किती कालावधी असेल नवे नियम काय असतील ते समजण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे.