27 May 2020

News Flash

करोनाचा प्रसार करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून मारहाण

मारहाणीत जखमी झालेल्या इसमावर रुग्णालयात उपचार सुरू

संग्रहित छायाचित्र

 

भोपाळमध्ये तबलिगी जमात परिषदेला हजर राहून बावना या आपल्या गावात परतलेल्या एका इसमावर करोनाचा फैलाव केल्याचा आरोप करून त्याला काही जणांनी मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या मारहाणप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून मारहाणीत जखमी झालेल्या इसमावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे चुकीचे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झाले होते.

बावना या गावातील इसमाचे नाव मेहबूब अली असे असून तो भोपाळला तबलिगी जमात परिषदेसाठी गेला होता. जवळपास ४५ दिवस तेथे वास्तव्य केल्यानंतर तो भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून गावात परतला होता.

त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून घरी पाठविण्यात आले, तो गावात परतला असता करोनाचा प्रसार करण्यासाठी तो आला असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 12:20 am

Web Title: beating up on conspiracy to spread corona abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 भाजप खासदाराविरुद्ध कारवाई करण्याची मायावती यांची मागणी
2 Coronavirus: ब्रिटनमधील प्रसिद्ध भारतीय डॉक्टरचा करोनामुळं मृत्यू
3 करोनापासून कसं वाचता येईल? वुहानमधल्या भारतीयांनी दिला मोलाचा सल्ला
Just Now!
X