22 January 2021

News Flash

प्रसिद्ध बंगाली अभिनेता मनु मुखर्जी यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन

वयाच्या ९० व्या वर्षी मनु मुखर्जी यांची प्राणज्योत मालवली.

प्रसिद्ध बंगाली अभिनेता मनु मुखर्जी याचं रविवारी ( ६ डिसेंबर) कोलकात्ता येथे निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. मनु मुखर्जी यांचं कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. गेल्या कित्येक दिवसांपासून मनु मुखर्जी यांचं प्रकृती खालावली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचं १५ नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर मनु मुखर्जी यांची प्रकृती जास्त खालावली होती. मनु मुखर्जी आणि सौमित्र चटर्जी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

मनु मुखर्जी यांनी चित्रपटांसोबतच काही वेब सीरिजमध्येदेखील काम केलं होतं. त्यांनी नील आकाश निकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वात शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 11:55 am

Web Title: bengali actor manu mukherjee dies at 90 ssj 93
Next Stories
1 आणखी एक मित्रपक्ष सोडणार भाजपाची साथ? एनडीएसंदर्भात उद्या घेणार निर्णय
2 दारुच्या नशेत पोलिसाला मारहाण करणाऱ्या काँग्रेस आमदाराच्या मुलाला अटक
3 करोनात काहीही होऊ शकतं! झालं असं की… पीपीई किट घालून करावं लागलं लग्न
Just Now!
X