बंगळुरु एफसी फुटबॉल क्लबनेही केरळमधील पुरात अडकलेल्या लोकांसाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. क्लबचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने एका व्हिडीओच्या माध्यमातून केरळमधील पुरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करण्याचं आवाहन केलं आहे. बंगळुरु एफसी फुटबॉल क्लब पूरग्रस्तांसाठी जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणार आहे.

गेले काही दिवस केरळला पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही परिस्थिती पाहता केंद्र सरकारने केरळसाठी ५०० कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. सध्या एनडीआरएफ, लष्कर, राज्य पोलिस यांच्या मदतीने पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याचं काम सुरु आहे.