देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र देशात करोना लसींच्या तुटवडा असल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यात लसीकरण नोंदणी करण्यासाठी अडचणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. लशींचा तुटवडा आणि अ‍ॅप वापरताना येणाऱ्या अडचणी यामुळे डोकेदुखी वाढली असताना आता बनावट अ‍ॅपचा सुळसुळाट दिसून येत आहे. त्यामुळे इंडियन कम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं (सीईआरटी) बनावट अ‍ॅपबद्दल नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

करोना लसीकरणासाठी नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचा फायदा काही भामटे घेताना दिसत आहेत. यासाठी एसएमएसद्वारे नागरिकांची फसवणूक केली जात आहे. लिंक पाठवून या अ‍ॅपद्वारे लसीकरणाची नोंदणी करा असं आवाहन केलं जात आहे. या बाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर इंडियन कम्प्यूटर इमर्जन्सी टीमनं शहनिशा केली आहे. त्यानंतर बनावट अ‍ॅपबद्दल खुलासा झाला आहे. या बनावट अ‍ॅपद्वारे मोबाईल वापरकर्त्यांचा डेटा चोरी केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बनावट अ‍ॅपची लिंक डाऊनलोड करू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. सीईआरटीनं पाच बनावट अ‍ॅपची माहिती दिली आहे. यात Covid-19.apk, Vaci_Regis.apk, MyVaccin_V2.apk, Cov-Regis.apk आणि Vccin-Apply.apk या अ‍ॅपचा समावेश आहे.

महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी!

करोना लसीकरणासाठी कुठे नोंदणी कराल?
करोना लसीकरण नोंदणी सध्या दोनच ठिकाणी करता येते. सरकारच्या CoWIN आणि आरोग्य सेतू या दोन अ‍ॅपवरच करोना लसीकरणाची नोंदणी करता येते. हे दोन्ही अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत.

दिल्लीमधील पोलीस ठाण्यात अमित शाह बेपत्ता झाल्याची तक्रार

कशी कराल लसीकरणासाठी नोंदणी?

1. cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका
२. मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून Verify वर क्लिक करा.

३. ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. इथे तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा.

४. तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.

५. एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.

६. आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अ‍ॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.