News Flash

भबानीपूरचे आमदार भाजपात

आमदार असूनही विरोधी पक्षात असल्याने आतापर्यंत मतदार संघातील गोरगरीब लोकांना त्याचा काहीच फायदा झालेला नाही.

भबानीपूरचे आमदार भाजपात
(संग्रहीत छायाचित्र)

गुवाहाटी : आसाममधील भबानीपूरचे आमदार पाणीधर तालुकदार यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. आपल्या मतदार संघातील लोक गरीब असून त्यांचा फायदा व्हावा, मतदार संघाचा विकास करता यावा, यासाठी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला. विकासासाठी सत्ताधारी पक्षासोबत मिळून काम करायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार असूनही विरोधी पक्षात असल्याने आतापर्यंत मतदार संघातील गोरगरीब लोकांना त्याचा काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यासोबत काम करण्यासाठी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रं ट सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 12:07 am

Web Title: bhabanipur mla in bjp entry akp 94
Next Stories
1 “शरजिल इमामच्या भाषणाची सुरूवात अस्सलाम आलेकुमनं झाली याचा अर्थ…”, सरकारी वकिलांचा युक्तिवाद
2 GDP Failure : मोदींनी काँग्रेसकडे यावं, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील – राहुल गांधी
3 अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या २० वर्षांचं व्लादिमिर पुतिन यांनी केलं एका शब्दात वर्णन, म्हणाले,…
Just Now!
X