भीम आर्मीचा राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतनच्या फतेहपूर येथील घरी पोलीस पोहचले. तिथे त्यांनी पोलिसांनी विनय रतनच्या आईशी त्यांनी संवाद साधला. विनय रतनच्या भावाशीही ते बोलले. विनय रतन फरार आहे त्यामुळे आम्ही त्याचे वॉन्टेडचे पोस्टर लावतो आहोत असे पोलिसांनी सांगितले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विनय रतन पोस्टर लावताना पोलिसांच्या शेजारी उभा होता आणि तरीही पोलीस त्याच्या वॉन्टेडचे पोस्टर लावत बसले.

पोस्टर लावून पोलीस निघून गेले, त्यानंतर काही तासांनी परत आले. तेव्हा विनय रतन तिथून पळा होता. पोलिसांनी त्याच्याशीही गप्पा मारल्या. मात्र हाच रतन आहे हे पोलिसांनी ओळखले नाही असे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे पोस्टर लावणारे पोलीस अडचणीत आले आहेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे सहराणपूर पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.

विनय रतन हा जातीयवादी हिंसाचार भडकवण्यासाठी वॉन्टेड आहे. मे २०१७ पासून तो फरार आहे. पोलिसांनी विनय रतनवर १२ हजारांचे बक्षीसही ठेवले आहे. तीन हवालदार आणि दोन पोलीस सब इन्स्पेक्टर पोस्टर लावण्यासाठी गेले होते. मात्र विनय रतनला ते ओळखू शकले नाहीत. स्थानिक प्रसारमाध्यमे आणि पोलीस यांनी हा विनय रतनच असल्याचे सांगितले. हे समजल्यावर काही तासांनी पोलीस पुन्हा त्याच्या घरी गेले मात्र तोवर विनय रतनने तिथून पोबारा केला होता.

ज्या चौकीतल्या पोलिसांनी हा कारनामा केला ती चौकी फतेहपूरची होती. एसएचओ भानू प्रताप सिंह यांनी म्हटले आहे की विनय त्यावेळी घरी होता हे आम्हाला माहित नव्हते. कोर्टाची नोटीस घेऊन पाच जणांचे पथक तिथे पोहचले होते. विनय रतनला त्यांनी कोणीही पाहिले नव्हते. विनयच्या आईला त्या माणसाबद्दल विचारले असता तिने हा विनयचा भाऊ सचिन आहे असे सांगितले. पोलिसांनी तिच्यावर विश्वास ठेवला. मात्र काही वेळाने आम्हाला स्थानिक लोकांनी विनयच घरी आहे असे सांगितले तेव्हा आम्ही पुन्हा त्याच्या घरी गेलो मात्र तोवर विनय तिथून पळाला होता असेही पोलिसांनी म्हटले आहे. कोणत्याही आरोपीला पकडले जाण्याची भीती असते विनयच्या चेहेऱ्यावर ती दिसून आली नाही. त्यामुळे आम्ही त्याला ओळखू शकलो नाही असेही पोलिसांनी म्हटले आहे.