बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. बिहार विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यासंबंधीची मागणी प्रदीर्घ काळापासून केली होती. ती आता मंजूर करण्यात आली आहे. बिहार विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी जातीच्या आधारे जनगणना करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

२१ जानेवारी २०१९ रोजी नितीश कुमार यांनी म्हटलं होतं की बिहारमध्ये जातीच्या आधारे जनगणना झालेली नाही. कोणत्या जातीचे किती लोक आहेत ते समजलं पाहिजे. १९३१ नंतर देशात जातीच्या आधारे जनगणना झालेली नाही. अनुसूचित जाती आणि जमाती तसेच धर्माच्या आधारे जनगणना करण्यात आली आहे. मात्र जातीच्या आधारे जनगणना झाली पाहिजे अशी मागणी नितीशकुमार यांनी केली होती. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे.