बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते जगन्नाथ मिश्रा यांचे आज (दि.१९) दीर्घ आजाराने निधन झाले, ते ८२ वर्षांचे होते. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव यांचे बिहारच्या राजकारणात आगमन होण्यापूर्वी जदयूचे नेते जगन्नाथ मिश्रा हे तीन वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. मिश्रा हे बिहारचे एक मोठे नेते होते, त्यांनी बराच काळ राजकीय क्षेत्रात घालवला.

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मिश्रा यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना शोक व्यक्त केला आहे. तसेच बिहार सरकारकडून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री मिश्रा यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar former chief minister jagannath mishra has passed away in delhi after prolonged illness aau
First published on: 19-08-2019 at 12:07 IST