News Flash

धडक देऊन पळणाऱ्या SUVने बाइकस्वाराला फरफटत नेलं, चाकाखाली येऊन दुर्देवी अंत

प्रदीप कारच्या दरवाजाला लटकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपण दिसते.

धडक देऊन पळणाऱ्या SUVने बाइकस्वाराला फरफटत नेलं, चाकाखाली येऊन दुर्देवी अंत

दुचाकीला धडक देऊन पळणाऱ्या एका कारला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना, दुचाकीस्वाराचा SUV च्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या कृष्णनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सीसीटीव्ही मध्ये या संपूर्ण अपघाताचे चित्रीकरण झाले आहे. एसयूव्हीच्या दरवाजाला लटकलेल्या या दुचाकीस्वाराला ४०० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.

कारची ओळख पटली असून, चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे पोलिसांनी सांगितले. प्रदीप बन्सल असे मृताचे नाव आहे. रविवारी सकाळी प्रदीप दुकानामधून परत येत होते. कृष्ण नगरच्या दिशेने बाईक वळवत असताना मागच्या बाजूने आलेल्या एसयूव्हीने त्यांच्या बाईकला धडक दिली. त्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर प्रदीप यांनी बाईक तिथेच सोडली व एसयूव्ही चालकाला रोखण्यासाठी दरवाजा पकडला.

ते दरवाजाला लटकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपण दिसते. चालक इतक्या वेगात गाडी पळवता होता की, त्यामुळे बन्सला यांच्या हाताची ग्रीप सुटली व ते चाकाखाली आले. त्यांना लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप यांच्या पत्नीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला. त्यांना एक मुलगा असून ते आई-वडिलांसोबत राहत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 5:03 pm

Web Title: biker loses life in bid to stop suv after being hit in delhi dmp 82
Next Stories
1 शंभर रूपये ठेवा आणि बिनधास्त कॉप्या करा; मुख्याध्यापकानं दिल्या विद्यार्थ्यांना टिप्स
2 टोपी दिसताच चोराची देशभक्ती जागी झाली, आणि…
3 लक्षात ठेवा! १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत; ‘एमआयएम’च्या नेत्याचे बेताल वक्तव्य
Just Now!
X