News Flash

Video : करोनाला पळवण्यासाठी भाजपा नेते यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर

यज्ञ कुंडातल्या धुरामधून हानिकारक विषाणू नष्ट होत असल्याचा दावा

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्याप दिसून येत आहे. जगभरातील वैज्ञानिक करोनापासून लढण्यासाठी विविध औषधे आणि लसींच्या शोधात आहेत. उत्तर प्रदेशातही योगी सरकार करोनापासून लढण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच मेरठ येथील भाजपाचे नेते गोपाल शर्मा यांनी करोना व्हायरसला संपवण्यासाठी वेगळाच उपाय केला आहे. गोपाल शर्मा यांनी यज्ञ कुंडातील धुरापासून आणि शंख नादातून करोना विषाणू संपवता येऊ शकतो असे म्हणत व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये गोपाल शर्मा सायकलवर एक यज्ञ कुंड घेऊन फिरताना दिसत आहेत. यज्ञामध्ये गोवऱ्या, देशी गायीचे तूप, आंब्याच्या झाडांच्या काड्या, कापूर हे सगळं एकत्र करून हवन पेटवण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितले आहे. यज्ञ कुंडातल्या धुरामधून वातावरणातील हवा शुद्ध होते आणि हानिकारक विषाणू नष्ट होतो. तसेच ऑक्सिजचं प्रमाण देखील वाढते असा दावा गोपाल शर्मा यांनी केला आहे.

याआधी देखील करोना विषाणू पासून वाचण्याचा दावा अनेक राजकारण्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गोमूत्र प्यायल्याने करोना होत नसल्याचा दावा केला होता. तसेच करोनाची दुसरी लाट सुरू असताना लोकांनी एकवेळा यज्ञ करावा, असे आवाहन मध्य प्रदेशच्या सांस्कृतिकमंत्री उषा ठाकूर यांनी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 2:44 pm

Web Title: bjp leader performs hawan in meerut neighbourhood to end coronavirus abn 97
Next Stories
1 “केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं मत देशाचं मत नाही”, परराष्ट्रमंत्र्यांनी सुनावलं!
2 स्पुटनिक लसीचे दोन डोस व २४ दिवसांची रशियावारी फक्त सव्वा लाखात
3 “नितीन गडकरी काय सांगत आहेत, हे नरेंद्र मोदी ऐकतायत का?”
Just Now!
X