महाभारत एकट्या द्रौपदीमुळे घडले. स्त्रीवादाची ती जननी होती असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही. द्रौपदीला पाच पती होते पण ती एकाचेही ऐकत नव्हती. तिने कृष्णाला सखा आणि मित्र मानले होते त्याचेच तिने ऐकले. हे वक्तव्य केले आहे भाजपचे महासचिव राम माधव यांनी. द्रौपदीमुळे महाभारताचे युद्ध झाले या युद्धात १८ लाख लोकांचा मृत्यू झाला. द्रौपदीला हक्क हवा होता म्हणून ही लढाई झाली असेही वक्तव्य राम माधव यांनी केले.

पणजी या ठिकाणी झालेल्या एकदिवसीय भारतीय विचार महोत्सवात राम माधव यांनी त्यांची मते मांडली आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. द्रौपदी जर स्त्रीवादाची जननी असेल तर मग शिखंडी हा काय पहिला हा LGBT (तृतीयपंथीय) कार्यकर्ता होता का? असे प्रश्न विचारून राम माधव यांना ट्रोल करण्यात आले आहे.