News Flash

खासदाराकडून हल्ल्याचा आयएएस अधिकाऱ्याचा आरोप

अतिक्रमण हटविल्यामुळे खासदार कार्यकर्त्यांनी मारहाण करत बांधून ठेवल्याची तक्रार या अधिकाऱ्याने दिली.

भाजप खासदाराच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार दिल्लीतील एका आयएएस अधिकाऱ्याने पोलिसांत दिली आहे. अतिक्रमण हटविल्यामुळे खासदार कार्यकर्त्यांनी मारहाण करत बांधून ठेवल्याची तक्रार या अधिकाऱ्याने दिली.
उत्तर-पश्चिम दिल्लीचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या संजय गोएल यांनी या हल्ल्याचा आरोप केला असून सीसीटीव्ही चित्रणाद्वारे आरोपींचा तपास सुरू करण्यात आला आहे. सकाळी ११.४५ वाजता ७० लोकांनी कंझवाला भागातील कार्यालयात प्रवेश करून मला मारहाण करताना २५ मिनिटे कैद करून ठेवले. यातील एका हल्लेखोराने परमिंदर असे स्वत:चे नाव सांगत भाजप खासदार उदित राज यांचा सचिव असल्याचे सांगितले, अशी माहिती गोएल यांनी दिली. याप्रकरणी खासदार उदित राज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गोएल यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:03 am

Web Title: bjp mp behind attack on me says ias officer
Next Stories
1 अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मोहीम
2 सूर्यापेक्षा पाच हजार पट अधिक वस्तुमानाचे कृष्णविवर
3 ब्रिटनच्या नागरिकाविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट
Just Now!
X